26 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरविशेष'धुरंधर २ द रिव्हेन्ज'चा सोशल मीडियावर कहर...

‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’चा सोशल मीडियावर कहर…

चित्रपटातील प्रसंगांची होतेय प्रचंड चर्चा

Google News Follow

Related

धुरंधर २ द रिव्हेन्ज हा रणवीर सिंगच्या अभिनयाने नटलेला चित्रपट १९ मार्चला रिलिज झाला. या चित्रपटाचे प्रीमियर शो लोकांनी पाहिले आहेत. त्यातील काही प्रसंग थिएटरमध्ये शूट करून ते सोशल मीडियावर टाकले जात आहेत. त्यातून भारताची प्रतिमा कशी बदलत आहे, हे दाखवले आहे.

धुरंधर २ द रिव्हेन्ज या चित्रपटाच्या आधी जो धुरंधरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता त्याने विक्रमी कमाई केलीच पण हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. त्याच वेळी धुरंधर २ च्या आगमनाची प्रतीक्षाही होती. १९ मार्चला तो रिलिज होणार हे कळल्यानंतर त्याच्या तिकिटांच्या बुकिंगवर लोकांच्या उड्या प़डल्या. देशविदेशात धुरंधर २साठी लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

आता थिएटरमध्ये ज्यांनी जाऊन हा चित्रपट पाहिला आहे त्यातील काही लोक थिएटरमध्ये या चित्रपटातील आवडलेले प्रसंग मोबाईलवर शूट करून सोशल मीडियात टाकत आहेत. यातील एका प्रसंगात थिएटरमधील लोक आरोळ्या ठोकत आहेत. त्यात एका दहशतवाद्याला मारण्यापूर्वी त्याचा संपर्क चित्रपटात अजित डोवाल यांचे पात्र रंगवणाऱ्या आर. माधवन याच्याशी करून दिला जातो. तेव्हा माधवन त्याला म्हणतो की, हिंदू बडी डरपोक कौम है असे म्हणाला होतास ना. आता कळले ना? त्यानंतर माधवन भारत माता की जय ही घोषणा त्या दहशतवाद्याला द्यायला लावतो. तो रक्तबंबाळ झालेला दहशतवादीही मरण्यापूर्वी भारत माता की जय बोलतो आणि मग रणवीरसिंग अर्थात धुरंधर त्याला गोळी घालून मारतो. या प्रसंगावर लोक प्रचंड टाळ्या वाजवतात आणि जल्लोष करतात.

हे ही वाचा:

एचडीएफसी बँकेचा शेअर कोसळला; ₹१ लाख कोटींचे नुकसान

‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’चा सोशल मीडियावर कहर…

सरकारचा मोठा डिजिटल स्ट्राईक

पश्चिम आशियात तेल वाहतुकीवर मोठं संकट

नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्याच्या घटनेचाही छोटा व्हीडिओ या चित्रपटात आहे, त्यामुळे दहशतवाद्यांचे कसे कंबरडे मोडले हे दाखविण्यात आले आहे. अतिक अहमद हा उत्तर प्रदेशमधील माफिया काही वर्षांपूर्वी मारला गेला. पण त्याचाही या नोटबंदीमुळे कसा तीळपापड झाला हेही त्यात दाखविण्यात आले आहे, त्याचाही व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा