30.5 C
Mumbai
Sunday, May 17, 2026
घरविशेष'मन की बात'मधून मिळाले तीन वर्षांत कोटी कोटी

‘मन की बात’मधून मिळाले तीन वर्षांत कोटी कोटी

माहिती अधिकारातून मिळाली नवी माहिती

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत आल्यानंतर ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील जनतेशी थेट संवाद साधणे हा होता. त्या काळात रेडिओचे आकर्षण कमी होत चालले होते, मात्र या कार्यक्रमामुळे ऑल इंडिया रेडिओला नवसंजीवनी मिळाली. गेल्या तीन वर्षांत या कार्यक्रमामुळे किती महसूल गोळा झाला याची रोचक माहिती आता समोर आली आहे.

हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरला आणि प्रत्येक भागात पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होऊ लागली.

आरटीआयमधून आता या कार्यक्रमाच्या उत्पन्नाची माहिती समोर आली आहे. आरटीआय (माहिती अधिकार) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ‘मन की बात’ कार्यक्रमाने एकूण ₹५.३३ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.

हे ही वाचा:

एचडीएफसी बँकेचा शेअर कोसळला; ₹१ लाख कोटींचे नुकसान

‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’चा सोशल मीडियावर कहर…

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

मेट्रो बोगद्याजवळ बोअरवेल खणली, गुन्हा दाखल

ही माहिती प्रसार भारती यांनी आरटीआय कार्यकर्ते विवेक पांडे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे.

वर्षनिहाय उत्पन्न

२०२२-२३ (जानेवारी ते मार्च २०२३): ₹१६.६० लाख

२०२३-२४: ₹१.१७ कोटी

२०२४-२५: ₹१.६३ कोटी

२०२५-२६(जानेवारी २०२६पर्यंत): ₹२.३६कोटी

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, कार्यक्रमाचे उत्पन्न दरवर्षी वाढत आहे. यामुळे या कार्यक्रमाचा वाढता प्रभाव आणि लोकांमधील लोकप्रियता दिसून येते.

 जाहिरातींवर एकही खर्च नाही

आरटीआयमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या जाहिरातींसाठी किती खर्च करण्यात आला, याबाबतही माहिती विचारण्यात आली होती. यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाने उत्तर दिले की, जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२६ या काळात जाहिरातींवर एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा