29.8 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेष१ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण सुरु

१ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण सुरु

Google News Follow

पुण्याऐवजी आता मुंबईतून येत्या १ ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. ७५ वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महानगरपालिका तयार असल्याचं मंगळवारी हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी महापालिकेने ही जबाबदारी ठाकरे सरकारवर ढकलली होती, तर ठाकरे सरकारने केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचं कारण दिलं होतं. यावर उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झाडले होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचं धोरण तयार असून हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीत कोणताही मोठा बदल न करता यावरचा अंतिम मसूदा लवकरच जाहीर करु, अशी हमी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला दिली. यावर समाधान व्यक्त करत आता कुठे आम्हाला यात आशेचा किरण दिसू लागलाय. या मुद्यावर केंद्र सरकारला अजुनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार आणि पालिका प्रशासन मुंबईच्याबाबतीत जागं झालं याचं आम्हाला समाधान आहे. या शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं समाधान व्यक्त केलं.

हे ही वाचा:

फोन टॅपिंग काँग्रेसच्याच काळात, मोदींच्या नव्हे

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

मुंबई महापालिकेकडे सध्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ३५०५ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तयार केलेल्या नियमावलीनुसार येत्या १ ऑगस्टपासून बीएमसी घरोघरी लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. हे लसीकरण प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून येत्याकाळात हे इतरांसाठी उपलब्ध करण्यात येईल अशी आशा आहे. जेणेकरून लसीकरणाच्या मोहिमेस अधिक बळकटी येऊन, लोकांचं लसीकरण अधिक वेगानं पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भातील याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यासुनावणीत पालिका आणि राज्य सरकार घरोघरी लसीकरणाबाबतचा आपला अहवाल सादर करतील.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा