34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणमुंबईकरांच्या जीवाशी खेळलात, आता पाण्याशी खेळ नको!

मुंबईकरांच्या जीवाशी खेळलात, आता पाण्याशी खेळ नको!

Google News Follow

Related

मुंबईत कोसळलेल्या पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुलात धोधो कोसळू लागले आणि या घटनेमुळे सगळेच हबकले. गेल्या ५० वर्षांत प्रथमच पंपिंग स्टेशनच्या बाबतीत असे काही घडल्यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा प्रकार पालिकेसाठी अजिबात शोभनीय नाही, अशी टीका करत या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी केली.

प्रभाकर शिंदे म्हणाले की, इतकी अतिवृष्टी आतापर्यंत झाली पण असा प्रकार कधीही झाला नाही. हा प्रकार झाल्यामुळे काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर पाणी उकळून प्या, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात होते. हा प्रकार मुंबई महानगरपालिकेसाठी भूषणावह नाही. २६ जुलै २००५चा जो पाऊस झाला, त्याहीवेळेला तिकडे पाणी जमले नाही. विहार तलाव वाहात होता त्यावेळी ही घटना घडली. हे पाणी हे नैसर्गिकरित्या विहार तलावात जाते. मग हे पाणी जलसंकुलात का गेले? माझ्या मते वाहत्या स्रोतात जो अडथळा निर्माण झाला तो प्रशासनाच्या लक्षात आला नाही. तो लक्षात आला असता तर दोन दिवस मुंबईकरांना पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागले नसते. किंवा पाणी उकळूनही प्यावे लागले नसते. म्हणून मी या साऱ्या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. नेमके काय झाले हे लोकांना कळावे आणि भविष्यात असे होणार नाही, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन काय पावले उचलणार आहे, याचाही अहवाल मिळावा असे पत्र मी दिले आहे.

हे ही वाचा:
घराघरात कंबरभर पाणी आणि बुडाले संसार

असहिष्णुतेच्या फुग्याला ‘प्यू रिसर्च’ ची टाचणी

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

 

पंपिग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. मुंबईतील बहुतांश भागांमध्ये  पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मुख्यत्वे जलशुद्धीकरण प्रकल्पातच पाणी शिरल्याने प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळेच आता यामागची नेमकी कारणे काय आहेत हे पालिका प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी  केली आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये हे शुद्धीकरण केंद्र बिघडल्यामुळे पाणीच आले नाही. त्यामुळे ऐन पावसात मुंबईकरांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागले. दक्षिण मुंबईसह अनेक भागांत भल्या पहाटे पालिकेचे पाणीच न आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच पाणीपुरवठा कधी होणार हे कळू न शकल्याने अनेक भागांतील नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागविणे भाग पडले. मातीमिश्रित दूषित पाणी घराघरात आल्यामुळे पाणी उकळून प्या, असे आवाहन पालिकेला करावे लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा