30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषघराघरात कंबरभर पाणी आणि बुडाले संसार

घराघरात कंबरभर पाणी आणि बुडाले संसार

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व येथील हनुमाननगर भागात पावसामुळे प्रचंड पाणी भरले. घराघरात चिखलाचे साम्राज्य होते. कितीही पाणी उपसले तरी घरातील पाणी कमी होण्याची चिन्हे नव्हती. अगदी हीच अवस्था मुंबईतील जवळपास सगळ्याच सखल भागात झाली होती. भांडुपच्या पंपिंग स्टेशनमध्येही पाणी शिरल्यामुळे पाणी पुरवठाच खंडित झाला तिथे सर्वसामान्यांच्या घरांची काय कथा, अशी स्थिती होती.

गेल्या काही वर्षांत पालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. थोड्याशा पावसानेही घरघरात पाणी शिरू लागले आहे. हनुमाननगर भागात कंबरभर चिखलाचे पाणी शिरल्याने रहिवासी हवालदिल झाले. घरातले छोटेमोठे सामाना एकतर वरच्या माळ्यावर हलवले किंवा मग जे सामान हलविणे शक्य नव्हते ते पाण्यात खराब होण्यासाठी ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. टीव्ही, फ्रीज, खाटा, कपडे, कपाटे, कागदपत्र सगळे महत्त्वाचे सामान पावसामुळे भिजून गेल्याने त्यांची दुर्दशा झाली. पाण्याचा जोर इतका होता की घराच्या दरवाजातून धोधो पाणी घरात शिरू लागले. सोबत बाहेरून आलेला कचराही घरात शिरत होता. ज्यांच्या घराला वरचा माळा नव्हता त्यांना घराबाहेर पडण्यावाचून आणि दुसरीकडे आसरा घेण्यावाचून पर्याय राहिला नाही.

हे ही वाचा:

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

भारत आजच मालिका जिंकणार?

कुंद्रा व सहकाऱ्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

ही अवस्था संपूर्ण मुंबईत झाली होती. घरात पाणी शिरल्याने वीज नव्हती. पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली. पाणी हळूहळू ओसरले असले तरी आता घराची दुर्दुशा पाहण्यासारखी नाही. झालेले नुकसान कोण भरून देणार ही नवी चिंता आता सर्वसामान्यांना सतावू लागली आहे. राज्य सरकार, पालिका ही नुकसान भरपाई देणार का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा