22 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषपुस्तक घेऊन youtube वर आलेत डॉक्टर संजय ओक!

पुस्तक घेऊन youtube वर आलेत डॉक्टर संजय ओक!

वैद्यकीय पेशातील अनुभवांचे लेखन

Google News Follow

Related

गरीब, गरजवंतांसाठी उपचारांच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा स्नेहमयी हात देणारे प्रख्यात डॉक्टर संजय ओक यांचे ‘बात निकलेगी तो’ हे दृकश्राव्य माध्यमातील पुस्तक लोकांना ऐकायला मिळणार आहे. आपल्या वैद्यकीय पेशादरम्यान आलेले अनुभव, त्यातल्या आठवणी, मनात उमटलेले विचार यांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. पण हे पुस्तक केवळ एका लेखकाची कलाकृती नाही तर समाजातल्या तळागाळातल्या गरीब मुलांना मदतीचा हात देण्यासाठी उचललेले एक पाऊलही आहे.

डॉ. संजय ओक यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक दशके सेवा दिली. त्या माध्यमातून रुग्ण आणि डॉ. ओक यांच्यात एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे. डॉ. ओक यांनी आपल्या या कारकीर्दीत आलेल्या अनुभवांवर अनेक पुस्तके लिहिली. इंग्रजी, मराठीतील ५३ पुस्तके त्यांनी आतपर्यंत लिहिली आहेत. आता त्यांचे हे ५४वे पुस्तक येत आहे. मात्र याचे वेगळेपण असे की, ते दृकश्राव्य माध्यमातून लोकांपुढे मांडण्यात आले आहे.

डॉ. ओक आपल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल सांगतात की, आज मराठी भाषेतील वाचकांची संख्या कमी झालेली आहे, असे नाही, पण लोकांना या कथा-कहाण्या यूट्युबमधून ऐकाव्याशा वाटतात. अमित खोमणे, संकेत पाटील या तरुणांनी डॉ. ओक यांना ही कल्पना सांगितली आणि त्यातून हे नव्या स्वरूपातले ‘बात निकलेगी तो’ हे पुस्तक लिहिले आहे.

या पुस्तकाला हिंदी शीर्षक का, याबद्दलही डॉ. ओक सांगतात की,  बात निकलेगी तो, ही जगजीत सिंग यांनी गायलेली ही गझल आहे. ओक यांच्या ती आवडीची. त्यांचे जगजीत सिंह यांच्याशी वैयक्तिक अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. काफिल आजर यांनी हे गीत लिहिले होते. तेच शब्द या पुस्तकासाठी देण्यात आले. नव्या पुस्तकाचे लिखाण करतान ही गझल आठवत होती. म्हणून हेच नाव या पुस्तकाला देण्याचा निर्णय डॉ. ओक यांनी घेतला.

या पुस्तकात ३२ लेखांक किंवा विचारांक आहेत. छोट्या छोट्या कथांमधून डॉ. ओक यांच्यातील संवेदनशील डॉक्टर डोकावताना दिसतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल डॉ. ओक यांनी लिखाण केले आहे.

हे ही वाचा:

अमित शाह फरीदाबादमध्ये उत्तर क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघातात पाच मित्रांचा मृत्यू

वामपंथी इतिहासकारांनी सोयीप्रमाणे इतिहास लिहीला!

दोन शार्प शूटर्सनी केला अहिल्यानगरातील बिबट्याचा खात्मा

डॉक्टरांनी गेली ४ दशके लहान मुलांवर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक खेड्यांमधील लहान मुलांसाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. वाडा, मोखाडा, चिपळूण, शिरपूर, बारामती, कुडाळ, वडूज, सातारा येथे जाऊन डॉ. ओक यांनी लहान मुलांवर या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत पण, तिथे छोट्या कॅम्पमध्ये प्रत्येक शस्त्रक्रिया होणे शक्य नसतं त्यामुळे त्यांना मुंबईत आणावं लागतं. पण त्यासाठी काही आर्थिक मदतीची गरज असते. शिशु शल्य सेवा हे प्रतिष्ठान त्यासाठी डॉ. ओक यांनी उभं केलं आहे. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशन या संस्थेच्या छत्रछायेखाली हा उपक्रम राबवला जातो. या पुस्तकातून जी काही धनराशी जमा होईल, ती या उपक्रमासाठी वापरण्यात येईल. पण हे पुस्तक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने केलेले नाही. पण आपल्या इच्छेनुसार आपण मदत करू इच्छित असाल तर ती करता येईल, असे डॉक्टर आवाहन करतात. त्याच मदतीतून वर्षभरातून गोरगरीब मुलांच्या १००० ते १२०० शस्त्रक्रिया करणे शक्य होईल.

यासंदर्भात सेक्रेटरी मेघा मोरे यांच्याशी 98336 58220 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. शिवाय, ज्यांना शिशू शल्य सेवा उपक्रमासाठी आर्थिक मदत करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशनच्या स्कॅनवर ती मदत करता येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा