25 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरविशेषवरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर

वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर

हवामानातील बदलामुळे तापमानात घट

Google News Follow

Related

प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना दिवाळीपूर्वी काही अंशी दिलासा मिळाला आहे. दिल्ली-नोएडातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसाने दिल्लीवासियांना दिवाळीची भेट दिली आहे. हवामानातील बदलामुळे तापमानात घट झाली आहे. शिवाय प्रदूषणापासूनही मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील अनेक भागात AQI पातळी ४०० वरून १०० पर्यंत घसरली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बवाना, कांझावाला, मुंडका, जाफरपूर, नजफगड, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे पाऊस पडला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बहादुरगड, गुरुग्राम, मानेसरसह एनसीआरच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. यासोबतच हरियाणातील रोहतक, खरखोडा, मत्तानहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषणाने विळखा घातलेल्या दिल्लीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरापासून दक्षिण- पश्चिम दिल्ली, एनसीआर (गुरुग्राम) तसेच हरियाणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाला. गोहाना, गन्नौर, मेहम, सोनीपत, खरखोडा, चरखी दादरी, मत्तानहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली, सोहना, रेवाडी, बावलमध्ये रिमझिम पाऊस झाला आहे. शुक्रवारीही दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे.

दिल्लीमधील वाढते प्रदूषण पाहता दिल्ली सरकारने कृत्रिम पावसाची तयारी केली आहे. २० आणि २१ नोव्हेंबरच्या सुमारास दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली सरकारने कृत्रिम पावसाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी मुख्य सचिवांना आज सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा: 

‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्राने या निर्णयाला पाठिंबा दिल्यास दिल्ली सरकार २० नोव्हेंबरपर्यंत शहरात कृत्रिम पावसाच्या पहिल्या टप्प्याची व्यवस्था करू शकते. मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की दिल्ली सरकारने IIT-कानपूर टीमच्या सल्ल्यानुसार कृत्रिम पावसाच्या फेज १ आणि फेज २ चा खर्च (एकूण 13 कोटी रुपये) उचलण्यास तत्वतः सहमती दर्शविली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा