29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषमतदार यादीतून नाव वगळलेल्यांना पुन्हा संधी!

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना पुन्हा संधी!

महाराष्ट्रासह सात राज्यांसाठी मोठा निर्णय

Google News Follow

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमधील अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी नव्याने अर्ज करता येणार आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी अशा कारणांमुळे ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मतदारांना पुन्हा नोंदणीची संधी मिळावी आणि पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नयेत, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांची बूथनिहाय यादी मतदान केंद्रे, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच ही यादी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल. मतदारांना आपले नाव वगळण्यामागील कारण तपासता येणार आहे. त्यानंतर संबंधित मतदारांना निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येईल.

या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर्स अर्थात बीएलओ यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अधिकाऱ्यांना संबंधित मतदारांशी संपर्क साधून अर्ज पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष भेटीसोबतच व्हॉट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. स्थलांतरित मतदारांना नव्या पत्त्याचा तपशील आणि आवश्यक पुरावे सादर करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

दरम्यान, महाराष्ट्रात मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. नाव नसल्यास निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करता येईल. या निर्णयामुळे मतदार यादीतून नाव वगळल्या गेलेल्या पात्र नागरिकांना पुन्हा नोंदणीची संधी मिळाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा