29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषएलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

Google News Follow

Related

कधीकाळी जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिलेले एलन मस्क अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारी मेटाच्या सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना त्यांनी चौथ्या क्रमांकावर ढकलले. तर, ११व्या स्थानी मुकेश अंबानी यांनी आणखी मजबूत पकड मिळवली असून १४व्या स्थानावरच्या गौतम अदानी यांची परिस्थिती थोडी बिकट झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या १०मधील अमेरिकेच्या नऊ अब्जाधीशांना भारी पडले आहेत. ते जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्याजवळ २२६ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. या वर्षी त्यांनी १८.४ अब्ज डॉलरची कमाई केली. दुसऱ्या क्रमांकावर एमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस आहेत. या वर्षी ३०.६० अब्ज डॉलरची कमाई करणाऱ्या बेजोस यांच्या जवळ २०७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

हे ही वाचा:

हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!

निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू

‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!

४१ दिवस शांततेचे…

एलन मस्क पुन्हा तिसऱ्या स्थानी आहेत. सोमवारी त्यांच्या संपत्तीत ५.७८ अब्ज डॉलरची वाढ झाली. तर, मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत २.७७ अब्ज डॉलरची घट झाली. त्यामुळे १८६ अब्ज डॉलर संपत्तीसह मस्क पुन्हा तिसऱ्या स्थानी विराजमान झाले. मार्क झुकरबर्ग १८४ अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानी गेले. या वर्षी झुकरबर्गच्या संपत्तीत ५६.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही जगभरातील सर्वाधिक कमाई ठरली आहे.

अंबानी मजबूत, अदानींची घसरण
सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये तेजी होती तर, अदानी ग्रुपचे बहुतांश समभाग घसरले. त्यामुळे दोन्ही उद्योगांच्या संपत्तीच्या मूल्यावर परिणाम झाला. अदानी यांचे सोमवारी एक अब्ज डॉलरचे नुकसान झाले. त्यामुळे ते १४व्या क्रमांकावर होते. तर, दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मूल्यात १.३९ अब्ज डॉलर वाढ झाल्याने त्यांनी ११व्या स्थानी आणखी पकड मजबूत केली. मुकेश अंबानीची एकूण संपत्ती ११४ अब्ज डॉलर आणि अदानी यांची १०३ अब्ज डॉलर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा