सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना अवमानाची नोटीस बजावून दोघांनाही पुढील दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.सुप्रीम कोर्टाने याअगोदरही बाबा रामदेव याना नोटीस बजावत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
पतंजली आयुर्वेद जाहिरातीकरून खोटे दावे करत आहे आणि दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजली विरोधात याचिका दाखल केली होती.यावरून आज न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना अवमानाची नोटीस बजावली असून पुढील दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार
मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे सहा बछड्यांना दिला जन्म
निवडणूक रोख्यांच्या माहितीचा गैरवापर करण्याविरोधात यंत्रणा नाही!
हिमाचल प्रदेशात काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
तसेच न्यायालयाने म्हटले की, या अगोदर कोर्टाने जाहिरातींवरून पतंजलीवर रोख लावण्यात आली होती.तरीही त्यांनी जाहिराती केल्या.आदेशानंतरही अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत ज्यात पतंजलीची औषधे इतर औषधांपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.यावरून पतंजली सातत्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पतंजलीच्या आयुर्वेदाच्या जाहिराती प्रकरणी कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून उत्तर मागितले होते.यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांना कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.