तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे आमदार टी राजा सिंह आपल्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतात. यावेळी टी राजा सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रामधून औरंगजेबाचे एक-एक निशाण मिटविण्याची मागणी टी राजा सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिली भाजपा आमदाराने ही मोठी मागणी केली आहे.
शिवजयंती निमित्त केलेल्या भाषणामध्ये टी राजा सिंह म्हणाले, आमच्या संभाजी महाराजांना हाल-हाल करून मारले त्याची कबर अजूनही संभाजी नगरमध्ये का आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही एकदा म्हणाला होतात, त्या औरंग्याच्या कबरीवर कुत्रे मुततील. आता ती वेळी आली आहे, महाराष्ट्रसह संपूर्ण हिंदूची मागणी आहे, त्या औरंग्याच्या कबरीवर लवकरात लवकर बुलडोजर चालवावा.
हे ही वाचा :
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या महिला भाविकांवर कट्टरवाद्यांकडून थुंकण्याचा प्रकार!
बांगलादेशी घुसखोरांविरोधातील दादरमधील मूक निदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्तीसगढ: नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकासह ग्रामस्थाची गळा दाबून हत्या!
एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून औरंग्याचे नाव मिटवले पाहिजे. आजही त्या गद्दारची कबर या ठिकाणी आहे. आजही त्याचे नावे इतर ठिकाणी दिसत आहेत. मी जेव्हा छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून उतरतो तेव्हा त्या ठिकाणी एक बोर्ड दिसतो ज्यावर ‘औरंगाबादमध्ये तुमचे स्वागत आहे’ लिहिलेले दिसते.
जर नावात बदल केला असेल तर अजूनही हेच नाव का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजकारण प्रत्येक गोष्टीवर करावे पण इतिहासाशी छेडछाड करू नये. छत्रपती संभाजी महाराजांना ज्याने मारले त्याचे नाव महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून हटवले पाहिजे, मिटविले पाहिजे, असे टी राजा सिंह यांनी म्हटले. तसेच दाऊद इब्राहीमची मुंबईमध्ये हजार करोडो रुपयांची मालमत्ता आहे. यावर देखील बुलडोजर चालवून त्यावर सरकारी शाळा आणि रुग्णालये उभारावे, अशीही मागणी टी राजा सिंह यांनी केली.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री से निवेदन है कि औरंगजेब की कब्र पर बुलडोजर चलाया जाए। pic.twitter.com/suJgjZSglA
— Raja Singh (@TigerRajaSingh) February 20, 2025