छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची हत्या केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२० फेब्रुवारी) नक्षलवाद्यांच्या एका गटाने एका शिक्षकाची आणि एका ग्रामस्थाची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरु केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या एका गटाने दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील तोडमा गावात पोहोचून प्राथमिक शाळेतील शिक्षक बमन कश्यप (२९) आणि अनीस राम पोयम (३८) यांना जंगलात नेले. नंतर नक्षलवाद्यांनी दोघांचीही गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह गावाजवळ फेकून दिले. पोलिसांचे खबरी असल्याच्या आरोपावरून दोघांचीही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी अलिकडेच अशाच अनेक घटना घडवल्या आहेत ज्यात पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दल आणि पोलीस दलांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक
इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके
‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी
दोन महिन्यांनी का होईना उद्धव ठाकरे बीडला जाणार!
दरम्यान, यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी नक्षलवाद्यांनी पोलिस खबरी असल्याच्या आरोपाखाली एका ३० वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. तर ३ फेब्रुवारी रोजी, विजापूर जिल्ह्यात दोन जणांची हत्या करण्यात आली, त्यापैकी एकाने नक्षलवाद सोडून आत्मसमर्पण करत सामान्य जीवन जगत होता. याशिवाय, २६ जानेवारी रोजी भैरमगड परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी बस्तर भागात नक्षलवादी हिंसाचारात ६८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.