महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयागराज येथील आयोजित महाकुंभ मेळ्याची बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी सांगता होत आहे. जगातील सर्वात मोठ्या या आध्यात्मिक मेळ्याला जगभरातील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावली. शेवटच्या दिवसागणिक उपस्थितांच्या संख्येने विक्रमी संख्या गाठली आहे.
दरम्यान, महाकुंभ- २०२५ च्या समारोपाच्या म्हणजेच शेवटच्या दिवशी, भारतीय हवाई दलाने महाकुंभ मेळा परिसरात एक हवाई शो आयोजित केला होता. हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या अद्भुत सादरीकरणाने भक्तांना रोमांचित केले. कुंभमेळ्याच्या पवित्र प्रसंगी, गंगा नदीच्या काठावर संत आणि भाविकांची मोठी गर्दी असताना आकाशात हवाई दलाच्या विमानांनी काही धाडसी कसरती केल्या. शिवरात्रीच्या महास्नानाच्या वेळी, सुखोई लढाऊ विमानाने भाविकांना अभिवादन केले.
शेवटचा दिवस आणि महाशिवरात्र यामुळे लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांसाठी हवाई दलाच्या या कवायती मंत्रमुग्ध करणाऱ्या ठरल्या. सुखोई लढाऊ विमानांनी केलेल्या कवायती आकर्षणाचा विषय ठरल्या. या कसरती पाहताना भाविकांमध्ये वेगळाच उत्साह असलायचे पाहायला मिळाले. अनेक भाविकांनी हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे म्हटले. तर, अनेक भाविकांना हा क्षण कॅमेरामध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही. लोकांनी तातडीने त्यांच्या मोबाईल, कॅमेरामध्ये या कवायती कैद करून घेतल्या. महाकुंभाच्या या शेवटच्या दिवसाची सांगता हवाई दलाच्या या भव्य प्रदर्शनाने झाली, यामुळे भाविकांना एक अनोखा अनुभव मिळाला.
हे ही वाचा..
केजारीवालांच्या ‘शीशमहाला’चे दोन वर्षांचे वीज बिल ४१ लाखांहून अधिक
तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर, मी तुझी ईएमआय भरतो
धक्कादायक! पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार!
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची बांगलादेशला भेट
जानेवारीच्या १३ तारखेला सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी झाली. जवळपास महिनाभर चाललेल्या या भव्य मेळ्यात ६५ कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले. साधू- भाविकांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. अनेक विदेशी नागरिकांनी हिंदू धर्माच्या अध्यात्माचा अनुभव घेतला.







