केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (२६ फेब्रुवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी महाकुंभाला उपस्थित न राहून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर बहिष्कार टाकला पाहिजे.
१३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभाचा आजच्या महाशिवरात्रीच्या अमृत स्नानानंतर शेवट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर लाखो लोक प्रयागराजमध्ये दाखल आहेत. आतापर्यंत ६४ लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यातील मंत्री, नेते आणि लपून-छपून का होईना इंडी आघाडीतील काही नेत्यांनीही संगमात स्नान केले आहे. तर अनेक नेते असेही आहेत ज्यांनी संगमात स्नान केले नाही. यावरूनच भाजपचे सहयोगी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण त्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात भाग घेतला नाही. महाकुंभात सहभागी न होऊन ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू असणे आणि महाकुंभात सहभागी न होणे हे हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
महाकुंभ मेळ्याच्या समारोप संध्येला प्रयागराजमध्ये सुखोई विमानांकडून कसरती
महाशिवरात्रीनिमित्त झेंडे, लाऊडस्पीकर लावण्यास विरोध; मदरशामधून दगडफेक
वैभव गोळे ज्युनियर मुंबई श्रीचा विजेता
बिहार मंत्रिमंडळ विस्तार: नितीश कुमार सरकारमध्ये भाजपाच्या ७ नव्या चेहऱ्यांचा समावेश!
ते पुढे म्हणाले, “लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी महाकुंभात सहभागी व्हायला हवे होते. त्यांना नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात भाग घेतला नाही. मला वाटते की हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.” रामदास आठवले जोर देत म्हणाले, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी या नेत्यांना धडा शिकवला आहे.