नोएडा पोलिसांनी एक मोठा बनावट प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणत बनावट मार्कशीट आणि शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मास्टरमाइंड आणि आणखी एक मुख्य आरोपी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची ओळख अभिमन्यु गुप्ता (वय ४०) आणि धर्मेंद्र गुप्ता (वय ४२) अशी झाली असून, ते मूळचे कानपूरचे रहिवासी आहेत. सध्या ते नोएडाच्या सेक्टर १०० आणि ९९ मधील भाड्याच्या घरात राहून हे अवैध धंदे चालवत होते.
पोलिसांनी दोघांनाही जल बोर्ड कार्यालय, सेक्टर-१ नोएडा येथे अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. यात ६६ बनावट मार्कशीट, ७ माइग्रेशन सर्टिफिकेट, २२ बायोडेटा, १४ कोऱ्या परीक्षा उत्तरपत्रिका, ९ डेटा शीट, ४ बनावट शिक्के, १ इंकपॅड, एचपी कंपनीचे २ लॅपटॉप, २ प्रिंटर, १ लँडलाइन फोन, १४ बँकांच्या चेकबुक, ५ कॅश डिपॉझिट स्लिप बुक, पंजाब नॅशनल बँकेची पासबुक, ८ रिसीट बुक, ८ एटीएम/डेबिट/क्रेडिट कार्ड, ७ मोबाईल फोन, ९ सिम कार्ड आणि २ कारचा समावेश आहे.
हेही वाचा..
भाजपने जे सांगितलं, ते करून दाखवलं
अमेरिकेने का थांबवली युक्रेनची लष्करी मदत
वक्फ कायद्यावरून जगदंबिका पाल काँग्रेस-आरजेडी-ओवेसींवर का संतापले?
पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी बेरोजगार, परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि नोकरीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्यांना लक्ष्य करत होते. हे आरोपी गुगलवरून आवश्यक माहिती गोळा करून अशा प्रकारची बनावट मार्कशीट, माइग्रेशन सर्टिफिकेट आणि बायोडेटा तयार करत, जे दिसायला अगदी खरेसारखे वाटत. ग्राहकाच्या मागणीनुसार त्यामध्ये गुण, टक्केवारी आणि वयातही फेरफार केला जात असे. या बनावट दस्तावेजांच्या बदल्यात आरोपी ८० हजार ते २ लाख रुपये पर्यंत पैसे घेत असत. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, या टोळीत आणखी किती लोक सामील आहेत आणि आतापर्यंत किती लोकांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आली आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
