वक्फ दुरुस्ती कायद्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी बुधवारी (२ जुलै) काँग्रेस, राजद आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, विरोधी पक्ष फक्त तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, तर वक्फ दुरुस्ती कायदा सामान्य गरीब आणि गरीब मुस्लिमांच्या हितासाठी आणला गेला आहे.
वक्फ विधेयकावर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी म्हटले, “वक्फ मालमत्तेचा बराच काळ गैरवापर होत होता. या विधेयकाचा उद्देश पारदर्शकता आणणे आणि बेकायदेशीर अतिक्रमणे थांबवणे हा आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की ओवेसी यांच्या पक्षाचा लोकसभेत फक्त एक खासदार असूनही, पारदर्शकता राखण्यासाठी त्यांना समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांनी आरोप केला की ओवेसी वक्फ मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना मदत करत आहेत.
जगदंबिका पाल यांनी राजद नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ” हे विधेयक कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याचे तेजस्वी यादव यांचे विधान म्हणजे संविधानाचा अपमान आहे.” यावेळी त्यांनी राहुल गांधींचे नाव घेत आठवण करून दिली की “राहुल गांधींनीही आधी हे विधेयक फाडले होते आणि जनतेने त्यांना उत्तर दिले होते. आता तेजस्वी यादवही तेच करत आहेत.”
आगामी बिहार निवडणुका लक्षात घेता, विरोधक वक्फ विधेयकावर राजकारण करत असल्याचा आरोप जगदंबिका पाल यांनी केला. ते म्हणाले, “मुस्लिम मतपेढीसाठी काँग्रेस, राजद आणि ओवैसी यांच्यात स्पर्धा आहे. पण बिहारचे लोक सुज्ञ आहेत आणि तुष्टीकरणाच्या या राजकारणाला उत्तर देतील.”
हे ही वाचा :
म. प्र. मध्ये खंडेलवाल बनले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
कांवड यात्रेच्या आधी दुकानावर परवाना आणि ओळख पटवणारा बोर्ड अनिवार्य
११२ दुकानांवर छापे: एक हजार किलोपेक्षा जास्त ‘गोमांस’ जप्त!
ऋषिकेश-गंगोत्री हायवेवर ट्रक पलटला
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “आम्ही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, चेन्नई, कोलकाता, आसाम, भुवनेश्वरसह देशातील विविध राज्यात गेलो आणि सर्वांना असे लक्षात आले की वक्फकडे देशात सर्वाधिक मालमत्ता आहे, परंतु वक्फच्या मालमत्तेचा फायदा सामान्य, गरीब मुस्लिमांपर्यंत पोहोचत नाही. मोदी सरकार त्याच्या सुधारणेसाठी सतत प्रयत्नशील आहे. कायदा मंजूर झाल्यानंतर, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातील गरीब आणि मागासलेल्या मुस्लिमांनी त्याचे स्वागत केले, केवळ पश्चिम बंगालचा मुर्शिदाबाद सोडून.
#WATCH | Mumbai: On the Waqf Amendment Act, Waqf Amendment Bill JPC Chairman and BJP MP Jagadambika Pal says, "We went to various places in the country, including Gujarat, Karnataka, Chennai, Kolkata, Assam, Bhubaneswar and everyonw realised that the Waqf has the most property in… pic.twitter.com/8dXynNWxTH
— ANI (@ANI) July 2, 2025
