29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरविशेषपित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला

पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला

गावकऱ्यांकडून होते आहे कौतुक

Google News Follow

Related

स्वत:च्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी वडील कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात. स्वत:च्या जीवाची बाजी लावू शकतात, हे दाहोदच्या एका धाडसी श्रमिकाने दाखवून दिले आहे.

त्याने अक्षरश: बिबळ्याच्या जबड्यातून आपल्या दोन मुलींना खेचून त्यांचा जीव वाचवला. अंकिल डामोर असे त्याचे नाव असून गावकरी आणि वनपाल त्याच्या या धाडसाने थक्क झाले आहेत.

अंकिल डामोरने हे धाडसी पाऊल उचलल्यामुळे त्याच्या अल्पवयीन मुलींना नवे जीवन मिळाले आहे. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास फुलपूर गावात घडली.

डामोर आणि त्यांच्या मुली त्यांच्या झोपडीत झोपले होते. पहाटेच्या सुमारास डामोर लघुशंका करण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र जेव्हा तो घरात आला, तेव्हा त्याच्यासमोर बिबळ्या होता. बिबळ्याने त्याच्या तीन वर्षांच्या मुलीला, वंशाला जबड्यात पकडले होते. हे पाहून डामोर घाबरला. मात्र तो त्याच स्थितीत बिबळ्याकडे झेपावला. बिबळ्या वंशाला घेऊन दरवाजातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र वडील खडकासारखे त्याच्या समोर उभे राहिले. त्यामुळे बिबळ्याला वंशाला सोडून देणे भाग पडले. मात्र बिबळ्याने नंतर पाच वर्षांच्या काव्याला जबड्यात पकडले.

हे ही वाचा:

तीन मोलकरणींनी केली ४० लाखांची साफ’सफाई’!

…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!

कोल्हापुरातील खाशाबा जाधवांचा विजय स्तंभ झाला ‘पराभूत’

मुख्यमंत्र्यांनी दिली समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ

यावेळी मात्र बिबळ्या जबड्यात रडणाऱ्या मुलीला पळून जाण्यात यशस्वी झाला. परंतु वडिलांना त्याचा पाठलाग करणे सोडले नाही. ते दाट जंगलातून बिबळ्याचा माग काढतच गेले आणि त्याला पकडले. डामोरे आपल्या मुलीला वाचवण्यासाठी बिबळ्याशी उघडपणे झुंज दिली.

काही सेकंद झटापट केल्यानंतर डामोरने बिबळ्यावर कापड फेकले. त्यामुळे तो घाबरला आणि जवळच्या झुडपात गायब झाला. मात्र त्याआधी दोमारची मुलगी काव्या त्याच्या जबड्यातून खाली पडली होती,  अशी माहिती देवगड बरियाचे साहाय्यक वनसंरक्षक प्रशांत तोमर यांनी दिली. दोमारच्या या धाडसाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा