29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरविशेषविश्वचषक स्पर्धेच्या तयारीदरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीदरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग

ड्रेसिंग रूमचे नुकसान झाल्याची माहिती

Google News Follow

Related

कोलकातामधील ऐतिहासिक क्रिकेट मैदान असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग लागल्याची घटना घडली होती. बुधवार, ९ ऑगस्ट रोजी रात्री आग लागली आणि ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आग मोठी होती आणि ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला, अशी माहिती समोर आली आहे.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही महिने उरले आहेत. बीसीसीआयकडून या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असतानाच आता कोलकातामधील या महत्त्वाच्या मैदानावर आग लागल्याच्या घटनेने गोंधळ उडाला.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११.५० वाजता ईडन गार्डन्स स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये आग लागली. या आगीच्या घटनेमुळे ड्रेसिंग रूमचे फॉल्स सिलिंग बरेच जळून खाक झाले आहे. याशिवाय ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले बरेच सामानही जळून खाक झाले. त्याचवेळी क्रिकेटपटूंनी वापरलेली उपकरणे खराब झाली.

काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या टीमने ईडन गार्डन्सला भेट दिली होती. बंगालच्या क्रिकेट असोसिएशननेही स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आयसीसीसमोर अहवाल सादर केला होता, त्यावेळेस सगळे ओके असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आगीच्या घटनेने आता चिंता वाढली असून तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

विश्वचषकाचे ५ सामने ईडन गार्डन्सवर

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर ‘आयसीसी एकदिवसीय विश्वचषक- २०२३’ मधील पाच सामने खेळवले जाणार आहेत. या पाचपैकी एक सामना उपांत्य फेरीचा आहे. ईडन गार्डन्स मैदानावर पहिला सामना २८ ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे तर, दुसरा सामना ३१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ नोव्हेंबरला तिसरा सामना होणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ११ नोव्हेंबरला सामना होणार आहे तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा