31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषतामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

अनेक गाड्या रद्द तर, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

Google News Follow

Related

हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाने तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे ८०० रेल्वे प्रवासी अडकले आहेत.

तिरुचेंदूर मंदिरातून चेन्नईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे प्रवासी सोमवारपासून पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या श्रीवैकुंटम येथे अडकून पडले आहेत. थुथुकुडीमध्ये आतापर्यंत ५२५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाचा आणि पुराचा श्रीवैकुंटमला सर्वाधिक फटका बसला आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

तिरुचेंदूर- चेन्नई एग्मोर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०६०६) १७ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता चेन्नईसाठी तिरुचेंदूरहून निघाली होती. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तिरुचेंदूरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली होती. यामध्ये एकूण ८०० प्रवासी अडकले आहेत आणि त्यापैकी सुमारे ५०० श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर आणि जवळपास ३०० जवळच्या शाळांमध्ये थांबले आहेत. दक्षिण रेल्वेने तिरुनेलवेली- तिरुचेंदूर सेक्शनवरील श्रीवैकुंटम आणि सेदुंगनल्लूर दरम्यानची रेल्वे वाहतूक स्थगित करण्याची घोषणा केली आहे. या भागातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पुरात बुडाले आहेत.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा

सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!

कथुआतील निरपराध हिंदूंवरील अत्याचाराचा पुस्तकातून पर्दाफाश

स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक

पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. चक्रीवादळामुळे विमानसेवांवरही विपरित परिणाम झाला आहे. पुरामुळे या जिल्ह्यांतील आतापर्यंत ७ हजार ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा