30 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरविशेषअकरावी प्रवेशासाठी मराठी हवीच!

अकरावी प्रवेशासाठी मराठी हवीच!

Related

अकरावीमध्ये प्रवेश घेताना सीईटी आता अनिवार्य असणार आहे. परंतु ठाकरे सरकारने केवळ चार विषयांवर सीईटी परीक्षा होईल असे जाहीर केले. या चार विषयांमध्ये मराठीचा समावेश नसल्याने आता ठाकरे सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

एरवी मराठीचा जयघोष करणारे ठाकरे सरकारने मराठीचा विषय अंतर्भाव केला नाही. त्यामुळे आता शालेय संस्थांनी देखील मराठी विषय सीईटी परीक्षेसाठी असावा असा आग्रह धरलेला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रीयेत मराठी विषय समाविष्ट करावा यासाठी आता राबविण्यात आलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनलाइन नोंदणीसाठी तब्बल ४ दिवसांमध्ये अडीच हजार जणांचा प्रतिसाद लाभलेला आहे.

हे ही वाचा:

मांजरीची हत्या करणाऱ्या अनोळखी ग्राहकावर गुन्हा

निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

अंबरनाथमधील थरारपट… नदी बने नाला!

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?

दहावी मूल्यांकन निकाल आता येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होतील. त्यानंतर ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा घेण्यात येईल. १०० गुणांची ही परीक्षा असून, ही परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.

जाहीर केलेल्या विषयांमध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र असे विषय होते. परंतु सीईटीला असणारे विषयांमध्ये मात्र मराठी हा विषय वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून मराठी हा विषय असावा, अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. यामध्ये मराठई शाळा संस्थाचालक संघ, मुख्याध्यापक संघटना, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत फेसबुक समूह, मराठी एकीकरण समिती अशांनी आता मराठी विषय सीईटीमध्ये अंतर्भाव करावे असे म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा तर केलाच, परंतु निर्णयांनाही खूप विलंब लावला. टाळेबंदीसारख्या निर्बंधांमुळे दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता शाळांकडून केलेल्या अंतर्गत मूल्यांकनद्वारे विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत. प्रवेशादरम्यान एकसमानता निर्माण व्हावी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळायला हवी. याच हेतूने आता महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळ पहिल्या वर्षासाठी म्हणजेच अकरावीसाठी सीईटीचा पर्याय निवडलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील (एफवायजेसी) जागांसाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटी घेण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा