33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषपहिल्यांदाचं एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनचे संचलन

पहिल्यांदाचं एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनचे संचलन

Google News Follow

Related

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या म्हणजेच एनडीएच्या दीक्षांत संचलनात (मार्चिंग) नवा इतिहास घडला आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनने संचलन केले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

एनडीएचे १४५ वे दीक्षांत संचलन गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे दिमाखात पार पडले. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एनडीएचे कमांडर व्हाइस ॲडमिरल अजय कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.

संचलनाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दीक्षांत संचलनात महिलांचा सहभाग असणे हे निश्चितच कौतुकास पात्र आहे.”

एनडीए मधून एकूण ३५३ विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संचलनानंतर ‘अंतिम पग’ पादाक्रांत केला गेला. संचलनात १२ विद्यार्थी हे मित्र देशांमधील होते.

हे ही वाचा:

‘अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी असणे हे भारताचे दुर्भाग्य’

‘द रेल्वे मेन’चा जगभरात धुमाकूळ!

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा भाऊ आणि वडील अटकेत

मुलुंडमध्ये प्रकाश गंगाधरेंच्या प्रयत्नाने नागरिकांना स्वस्तात कांदा

  • कमांडो चीफ ऑफ स्टाफ बॅनर – हेमंत कुमार
  • राष्ट्रपती सुवर्णपदक – प्रथम सिंग
  • राष्ट्रपती रौप्य पदक – जतीन कुमार
  • राष्ट्रपती कांस्यपदक हर्षवर्धन – शैलेश भोसले
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा