इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दावा केला आहे की, बांगलादेशातील लोकांना बळजबरीने दुसऱ्या धर्मात धर्मांतरित केले जात आहे आणि जे पालन करण्यास तयार नाहीत त्यांना तलवारीने धमकावले जात आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “लोकांना धर्मांतरासाठी धमकावले जात आहे. बांगलादेशात धर्मांतरण होत असल्याच्या बातम्या आम्हाला मिळाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना राजीनामा द्या अन्यथा धर्म परिवर्तन करा अशा धमक्या त्यांना देण्यात येत आहेत. अनेकांनी भीतीने धर्म परिवर्तन केले आहे. जे लोक धर्म बदलण्यास नकार देत आहेत त्यांना तलवारीचा धाक देवून धर्मांतर करण्यास जबरदस्ती केली जात आहे.
हे ही वाचा :
वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा
एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या डायरीमधून सापडले पाकिस्तानी नंबर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल
दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
बांगलादेशातील छळामुळे भारतात पळून आलेल्या मुलीबाबत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, भारतात पळून जाण्यासाठी नदी ओलांडून पोहून आलेल्या एका मुलीची बातमी समोर आली आहे. बीएसएफने तिला पकडले. बांगलादेशात तिला आणि तिच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या होत्या. सध्या ती बालगृहात आहे. तिला नागरिकत्व देण्यासाठी आणि तिच्या कुटुंबालाही सुरक्षा पुरवण्यासाठी इस्कॉन भारत सरकारला विनंती करेल, असे दास यांनी सांगितले.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला हिंदू साधू चिन्मय दास प्रभू यांची न्यायालयीन सुनावणी थांबवल्याबद्दल बांगलादेश सरकारवर राधारमण दास यांनी टीका केली. न्यायालयाच्या सुनावणीस अन्यायकारक विलंब होत आहे. बांगलादेश सरकार वकील प्रदान करेल आणि चिन्मय दास यांची लवकरच सुटका होईल अशी आशा असल्याचे दास यांनी सांगितले.