29 C
Mumbai
Tuesday, January 6, 2026
घरविशेषगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन!

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन!

एक प्रवासी बचावला, टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत

Google News Follow

Related

एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुजरातमधील अहमदाबादमधील मेघनानी नगर येथील निवासी भागात कोसळले. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १० क्रू मेंबर्सचा समावेश होता. या २४२ प्रवाशांमध्ये भाजपा नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटन, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. विजय रुपाणी यांच्यासह सर्व २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर फक्त एक प्रवासी सुखरूप बचावला असल्याची माहिती आहे. रमेश विश्वासकुमार असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी (१२ जुने) दुपारी १:३८ वाजता अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग-७८७ ड्रीमलायनर विमान धावपट्टीवरून उड्डाण केले. उड्डाण घेताच ते कोसळले. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले.  या अपघातात ५० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. अहमदाबाद पोलिसांनी विमान अपघातात जखमी झालेल्या २५ जणांची यादी जाहीर केली आहे.

अपघातस्थळावरून आतापर्यंत १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनेत मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक असेल. सिव्हिल हॉस्पिटलमधील १५ डॉक्टरही जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे.

हे ही वाचा : 

एअर इंडिया विमान अपघात एक प्रवासी बचावला!

आले आले पाकिस्तानचे कमाईचे दिवस आले…

अहमदाबाद विमान अपघातावर भारतीय क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त!

दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!

विजय रुपाणी कोण आहेत?

विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. विजय रुपाणी यांचा जन्म रंगून येथे झाला, जो आता म्यानमारमधील यांगून म्हणून ओळखला जातो. राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचे कुटुंब १९६० मध्ये गुजरातमधील राजकोट येथे स्थलांतरित झाले. रुपाणी शाळेत असतानाच आरएसएस शाखेत सामील झाले होते. त्यानंतर, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि राजकोट पश्चिम येथून पोटनिवडणूक जिंकली. ते २००६ ते २०१२ पर्यंत राज्यसभेचे सदस्य देखील होते. विजय रुपाणी यांनी २०१६ ते २०२१ पर्यंत गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत

दरम्यान, एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तर, विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा