टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गुरुवारी जाहीर केले की एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटींची मदत केली जाईल. या भीषण अपघातानंतर टाटा उद्योग समूहाने हा निर्णय घेतला.
या दु:खद प्रसंगी चंद्रशेखरन यांनी एक निवेदन जारी करत म्हटले, या क्षणी आपल्याला ज्या दुःखाचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी कोणतेही शब्द कमी पडतील. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासोबत आमच्या प्रार्थना व सहानुभूती आहेत.
हे ही वाचा:
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन!
अहमदाबाद विमान अपघातावर भारतीय क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त!
अहमदाबाद विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स स्थगित
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
त्यांनी पुढे सांगितले की, जखमी झालेल्या सर्व प्रवाशांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही टाटा समूह घेणार आहे, आणि त्यांना संपूर्ण काळजी व सहाय्य मिळेल याची खात्री केली जाईल.
सहाय्य उपक्रमाचा भाग म्हणून टाटा समूह बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये नवीन वसतिगृह उभारणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी देखील या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत म्हटले, या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक कुटुंबांवर मोठेदुःख कोसळले आहे. आम्ही सर्व पीडित कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत.
दुर्घटनेविषयी तपशील:
-
अपघातग्रस्त विमान: एअर इंडिया फ्लाइट १७१
-
मार्ग: अहमदाबाद ते लंडन
-
एकूण प्रवासी: २४२ (१० केबिन क्रू सदस्यांसह)
-
अपघात: विमानतळाच्या हद्दीच्या बाहेर झालेला अपघात, जिथे विमानातून काळा धूर निघताना दिसला.
-
MAYDAY सिग्नल पाठवल्यानंतर, विमानाचे नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला.
-
विमान चालवत होते: कॅप्टन सुमीत सभरवाल, सह-पायलट: क्लाईव्ह कुंदर
