गुरुवारी एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या भीषण अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अपघातस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातात २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. हा अपघात का झाला आणि त्यात प्रवासी वाचणे का शक्य नव्हते, हे अमित शहा यांनी सांगितले.
भीषण अपघात व तत्काळ प्रतिसाद
अमित शहा म्हणाले, आज दुपारी एअर इंडिया फ्लाइट AI-171 कोसळले आणि अनेक प्रवाशांचे प्राण गेले. संपूर्ण देश शोकाकुल आहे आणि पीडित कुटुंबांसोबत खंबीरपणे उभा आहे.
ते पुढे म्हणाले की, अपघाताची माहिती केंद्र सरकारला केवळ १० मिनिटांत मिळाली होती, आणि त्यानंतर त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्वरित प्रतिक्रिया दिली, असे त्यांनी सांगितले.
कोणतीही जीवितहानी का टळली नाही?
शहा यांनी स्पष्ट केले की, विमानात जवळपास १,२५,००० लिटर इंधन होते. त्यामुळे अपघातानंतर निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे कोणालाही वाचवता आले नाही.
अपघातातील आकडेवारी
-
प्रवासी: २३०
-
क्रू सदस्य: १२
-
एकमेव बचावलेले प्रवासी: सीट क्रमांक 11A वरील एक प्रवासी
-
दुर्घटनाग्रस्त मृतदेह सापडले: सुमारे २०४
DNA ओळख आणि मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया
“मी अपघातस्थळी भेट दिली आहे. बहुतेक मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या DNA नमुने गोळा केले जात आहेत, जेणेकरून ओळख पटवता येईल. परदेशी प्रवाशांच्या कुटुंबांनाही कळवले आहे, त्यांच्यासुद्धा नमुने घेण्यात येणार आहेत,” असे शहा यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये जवळपास १००० DNA नमुने घेतले जातील आणि राज्याच्या प्रयोगशाळांमध्ये ही क्षमता असल्यामुळे सर्व चाचण्या तिथेच होतील.
हे ही वाचा:
आले आले पाकिस्तानचे कमाईचे दिवस आले…
दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!
एअर इंडिया दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी १ कोटी
जिवंत प्रवाशाची घेतली भेट
शहा यांनी सांगितले की,या भीषण घटनेत एकच प्रवासी जिवंत सापडला आहे, आणि मी त्याची भेट घेतली.
या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असे आहे. तो कसा जिवंत राहिला याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना २०२५ सालातील सर्वात मोठी विमान दुर्घटना ठरली असून याचा Air India, विमा कंपन्या आणि बोईंग कंपनीवर मोठा परिणाम होणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
