31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषसिनेमांच्या पात्रात श्रीगणेशा, मनाला पटते का?

सिनेमांच्या पात्रात श्रीगणेशा, मनाला पटते का?

Google News Follow

Related

दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर राज्यात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणरायाची वेगवेगळी रूपे पाहून भक्तांचं मन अगदी तृप्त झालंय. आपल्याला आपला बाप्पा वेगवेगळ्या रूपात पाहायला आवडतोच. त्यातून मूर्तिकाराचं कौशल्य दिसत. कधी शंकराचं रूप तर कधी मोरावर, घोड्यावर विराजमान झालेले बाप्पा खूपदा पाहिलेत आणि कोरोना काळात डॉक्टर पोलिसांच्या रुपातसुद्धा आपण गणरायाला पाहिलं आणि ते आपल्याला मनापासून आवडलसुद्धा. कारण डॉक्टर पोलिसांनी नागरिकांसाठी केलेली काम ही अतिशय मोलाची होती.

पण जो विषय अतिशय चर्चेत आहे आणि आपल्या मनोरंजनासाठी बनलाय त्या रूपात गणराय साकारणं हे अयोग्य आहे. आता काही दिवसांपूर्वीच डायलॉगने, गाण्यांनी तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे ‘पुष्पा: द राइज’. या सिनेमातील पुष्पाच्या रूपात गणरायाची मूर्ती बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीची सगळीकडे स्तुती केली जातं आहे. ट्विटरवर सोशल मिडियावर ही मूर्ती प्रचंड गाजतेय.

अनेक बातम्यांमध्ये पुष्पा सिनेमातून प्रेरित होऊन साकारला बाप्पा, पुष्पराज अवतरले अशी हेडिंग देऊन ती बातमी केलीय. पुष्पा सिनेमाची प्रेरणा घेऊन गणराय कसा साकारला जाऊ शकतो आणि पुष्पराज कोण? म्हणजे पुष्पा हा सिनेमातील हिरो आहे मान्य आहे. लोकांना या सिनेमातील ती भूमिका आवडली हेसुद्धा ठीक आहे. पण कितीही झालं तरी त्या सिनेमात तो कलाकार एक अपराध करतोय. मनोरंजनासाठी तो सिनेमा अगदी उत्तम होता. अल्लू अर्जुनने पुष्पा ही भूमिका अतिशय चोख बजावली होती. मनोरंजनाचे साधन म्हणून प्रेक्षकांना तो चित्रपट अतिशय आवडलासुद्धा, प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला पुरेपूर न्याय दिला. हा सिनेमा रिलीज होताच त्या सिनेमातील ‘झुकेगा नही’ डायलॉगने जगभरातील लोकांना वेड लावले. या चित्रपटाच्या डायलॉग्सपासून ते डान्स स्टेप्सपर्यंत अनेक लोकांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी एवढंच नाही तर परदेशातील कलाकारांनी, खेळाडूंनी त्यावर रिल्स बनवले. पण हे एवढ्यावरच न थांबता लोकांनी झुकेगा नही च्या रूपात गणरायाची मूर्ती बनवली.

सिनेमापुरता किंवा एक ट्रेंड आला तो फॉलो केला सर्व ठीक होत. पण एक हिरो म्हणून त्याचा आदर्श काय? महत्वाचं म्हणजे एका श्रद्धास्थानाला त्याच रूप कस काय दिलं? आपण सगळेच आपल्या दैवताला त्याच्या कर्तुत्वाने रोल मॉडेल समजतो अपार श्रद्धा ठेवतो पण रोल मॉडेल समजून एखाद्या सिनेमातील पात्रामध्ये दैवताला कस काय बघता येईल? एका सिनेमातील पात्राची पूजा कशी काय करता येऊ शकते? कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना असं मानलं जात की, शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली तर ते सर्व अडथळे दूर होतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय कार्य पूर्ण होते. त्यामूळेच गणपतीला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते.

अशा प्रकारच्या मूर्ती साकारून गणेशोत्सवाचं, गनारायाचं जे पावित्र्य आहे त्याला कुठेतरी धक्का लागतोय. असा काहीतरी ट्रेंड काढून आपणच आपल्या श्रद्धेचं पावित्र्य नष्ट करतोय. गणेशोत्सव म्हणजे काही शिल्पकलेचा मेळावा नाहीय, की जो ट्रेंड आला जो सिनेमा गाजला त्या भूमिकेत गणरायाची मूर्ती साकारली. ते एक दैवत आहे आणि त्याच पावित्र्य जपणं हे आपलंच कर्तव्य आहे.

फक्त पुष्पाचं नाही तर आरआरआर सिनेमातील राम चरणाच्या भूमिकेत, तर केजीएफ मधील पात्रांचीसुद्धा गणरायाची मूर्ती बनवलीय. बाहुबली या गाजलेल्या सिनेमात शंकराची पिंडी खांद्यावर घेतलेला बाहुबली दाखविण्यात आला आहे. तशीच गणेशाची प्रतिमाही साकारण्यात आली होती. तेही तितकंसं योग्य नसलं तरी निदान महादेवाची पिंडी खांद्यावर घेतलेला श्रीगणेश म्हणून ते माफही करता येईल. पण चित्रपटात एखादे असे पात्र जे अपराध करते आहे, पण चित्रपटाची गरज म्हणून त्याकडे हिरो म्हणून आपण पाहतो आहोत, अशा पात्राला गणेशाच्या रूपात कसे काय पाहता येईल? उद्या एखादा खलनायकही आपल्याला आवडतो म्हणून गणेशाच्या रूपात दाखविला जाईल, तेव्हा काय करणार? म्हणूनच हे चुकीचे पायंडे पडू न देता त्याचा निषेध व्हायला हवा, त्याला विरोध व्हायला हवा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा