मीरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी तब्बल ७० हजार रुपये प्रती नग किमतीचे ५०० डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय ९ लाख ५० हजार रुपये प्रती नग किमतीचे २१ आॉटोमॅटीक डबेही खरेदी करण्यात येणार आहेत. असे एकूण ३८८९ डबे खरेदी करण्यात येणार आहेत आणि यासाठी महापालिकेला तब्बल १९ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने ३० जून रोजी हा ठराव केला आणि यानंतर आता तो वादामध्ये सापडला आहे. शहरातील स्वच्छतेसाठी १९ कोटी रुपये खर्चून नवे कचऱ्याचे डबे घेण्याचे निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये प्रत्येक डब्याची किंमत ७० हजार रुपये आणि आॉटोमॅटीक डब्याची किंमत ही ९ लाख ३४ हजार रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील, फायबर आणि आॉटोमॅटीक असे विवध प्रकारचे डबे खरेदी करण्यात येणार असल्याचे ठरावात मांडण्यात आले आहे. कोणार्क इन्फ्रा लिमिटेड कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, बाजारभावाच्या तुलनेत या डब्यांची किंमत ७ ते ८ पट जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा संशय नागरिकांमध्ये होत आहे. तसेच हे कचऱ्याचे डबे नसून सोन्याचे डबे आहेत, असे अनेक नागरिक बोलत आहेत.
हे ही वाचा :
२० दिवसांनंतर अंतरिक्षातून पृथ्वीवर परतले कॅप्टन शुभांशु शुक्ला
झारखंडमध्ये सरकारला सापडत नाहीत डॉक्टर्स
नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
आईएसएमएची इथेनॉल आयात बंदी कायम ठेवण्याची मागणी
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत. उबाठाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, त्या कचऱ्याच्या डब्यांना सोन्याचा मुलाला लावला असेल म्हणून त्याची ७० हजार रुपये इतकी किंमत असावी, असे मला वाटते. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे लोक प्रतीकिधी याची माहिती घेतली आणि याविरोधात आवाज उठविला जाईल.







