29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरविशेषगिल खेळला, पण पराभव झाला!

गिल खेळला, पण पराभव झाला!

बांगलादेशकडून भारताची हार

Google News Follow

Related

स्पिनरसमोर भारतीय क्रिकेटपटूंची भंबेरी उडते, हे पुन्हा अधोरेखित झाले. शुक्रवारी रंगलेल्या आशिया कपमधील सुपर ४ गटातील अंतिम सामन्यात भारताला बांगलादेशने उभारलेल्या २६६धावांचाही पाठलाग करता आला नाही. शुभमन गिलने केलेली १२१ धावांची खेळीही अपयशी ठरली. आता उद्या, रविवारी १६ सप्टेंबरला रंगणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामधील अंतिम सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असेल.

भारताने आधीच अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केल्याने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात भारताने नवीन खेळाडूंना आजमवायचे ठरवले होते. त्यानुसार, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या या तिघांसह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल उशिरा फलंदाजीला आला आणि त्याने काही वेळ फटकेबाजीही केली, परंतु तो विजयश्री खेचून आणू शकला नाही. तो ४२ धावांवर बाद झाला. भारताचा संघ ४९.५ षटकांत सहा विकेट गमावून २५९ धावा करू शकला. बांगलादेशविरुद्ध गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमधील भारताचा हा तिसरा पराभव आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध २०२२मध्ये एकदिवसीय मालिकाही गमावली होती.

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात शुभमन गिलने धडाकेबाज सुरुवात केली. त्याने आठ चौकार आणि पाच षटकारांसह १३३ चेंडूंमध्ये १२१ धावा तडकावल्या. समोरून त्याला भक्कम साथ मिळत नसतानाही तो एका बाजूने किल्ला लढवत होता.

बांगलादेशच्या तन्झिम हसन साकिबने भारताच्या सलामीच्या फलंदाजांना झटपट बाद केले. रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि एकदिवसीय सामन्यात तिलक वर्मा मैदानात उतरले. मात्र तिलक अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला. त्याला तन्झिमने बाद केले. त्यानंतर आलेल्या के. एल. राहुलने गिल याला चांगली साथ दिली. मात्र त्यानंतर तोही बाद झाला. त्यानंतर इशान किशनही एलबीडब्लू झाला. रवींद्र जाडेजा पुन्हा अपयशी ठरला. शेवटच्या क्षणी आलेल्या अक्षर पटेलने धडाकेबाज सुरुवात करून गिलसोबत ३९ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतर अक्षरने शार्दुल ठाकूरसोबत ४० धावांची भागीदारी केली. अक्षरने ३३ चेंडूंमध्ये ४२ धावांची तडाखेबंद खेळी करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र मुस्तफिझुर रहमान याने अक्षर पटेल याला बाद केले आणि भारताचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.

हे ही वाचा:

कुर्ल्यातील इमारतीमध्ये लागलेल्या आगीत ३९ जण जखमी

बारामुल्लामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बूमराह हे दोन फलंदाज झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूरने दोघांना बाद केले. तर, पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शामीने एक विकेट घेतली. त्याने लिट्टन दास याला शून्यावर बाद केले. त्यामुळे बांगलादेशची अवस्था चार बाद ६० झाली होती. मात्र कर्णधार शाकिब अली हसन आणि तोहिद हृदॉय यांनी ९१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर शतक पूर्ण करण्यास २० धावा शिल्लक असताना शार्दुलने शाकिबची विकेट घेतली. बांगलादेशची अवस्था सहा बाद १६० अशी होती, मात्र शेवटच्या फळीतील खेळाडूंनी बांगलादेशला ५० षटकांत २६५ धावांवर नेऊन पोहोचवले. त्यात नासम अहमद याने ४४ तर, मेहेदी हसन याने २९ धावा केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा