31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषक्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; आयपीएलच्या पुढील तीन हंगामाच्या तारखा जाहीर?

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; आयपीएलच्या पुढील तीन हंगामाच्या तारखा जाहीर?

क्रिकबझ’ने यासंदर्भात दिले वृत्त

Google News Follow

Related

क्रिकेट जगतातील बहुचर्चित अशी इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२५ हंगामाचा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडणार आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती आयपीएल सामने कधी खेळवले जाणार याची. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावाची सर्वजण वाट पाहत असतानाच आता लिलाव सुरू होण्यापूर्वीच आयपीएलच्या पुढील हंगामाची तारीख समोर आली आहे. ‘क्रिकबझ’ने यासंदर्भात माहिती दिली असून यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२५ चा हंगाम १४ मार्चपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २५ मे रोजी होईल. म्हणजेचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे.

ईएसपीएन- क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रँचायझींना एक ईमेल पाठवला आहे, ज्यामध्ये आयपीएल २०२५ सीझनची तारीख उघड करण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्यानंतर २०२६ आणि २०२७ या आणखी दोन सीझनच्या तारखा समोर आल्या आहेत. २०२६ चा हंगाम १५ मार्चपासून सुरू होईल आणि ३१ मे पर्यंत चालेल, तर २०२७ चा हंगाम देखील १४ मार्चपासून सुरू होईल आणि ३० मे पर्यंत चालेल. याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे ही वाचा..

अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर

‘अनिल परबांच्या साई रिसोर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार’

आंध्रात पहिले कंटेनर रुग्णालय सुरू

पाकिस्तान : कुर्रममध्ये प्रवासी व्हॅनवरील प्राणघातक हल्ल्यात ४० ठार

चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल २०२५ चा सीझन यानंतर पाच दिवसात सुरू होईल. यावेळी, आयपीएल २०२५ च्या महा लिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या ५७४ खेळाडूंपैकी ४८ कॅप्ड भारतीय खेळाडू, १९३ कॅप्ड परदेशी खेळाडू, ३ असोसिएट नॅशनल खेळाडू, ३१८ अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि १२ अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा महालिलावात समावेश आहे. या खेळाडूंपैकी केवळ २०४ खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये ७० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा