गुगलने मंगळवारी ‘सेफर विथ गुगल इंडिया समिट’ दरम्यान आपल्या नव्या ‘सुरक्षा चार्टर’ चे अनावरण केले. या उपक्रमामुळे भारताच्या डिजिटल क्षेत्राला अधिक सुरक्षित बनवण्यास मदत होणार आहे. ही योजना प्रामुख्याने युझर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवणे, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सायबर सुरक्षा वाढवणे, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) जबाबदारीने वापर सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रीत करते.
या सुरक्षा चार्टरमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत: इंटरनेट वापरकर्त्यांना फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे, सरकार आणि उद्योगांसाठी सायबर सुरक्षेचे बळकटीकरण करणे, आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार AI प्रणाली विकसित करणे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुगलचा ‘डिजिकवॉच’ प्रोग्रॅम, जो आर्थिक फसवणुकीविरोधातील AI-संचालित उत्पादनं व जनजागृती मोहिमा यांच्या माध्यमातून १७.७ कोटींहून अधिक भारतीयांपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा..
आत्मशुद्धीच्या वारीत सेक्युलरांची घुसखोरी
कामगार कल्याण योजनांचा फायदा बघा
इराणचा टॉप कमांडर अली शादमानी ठार
पूल कोसळल्यानंतर राज्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर सरकारची फुली!
गुगलच्या प्रणाली आता AI च्या मदतीने अधिक प्रभावी होत आहेत. सर्च इंजिन फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सना आता २० पट जास्त ओळखते, आणि ग्राहक सेवा व सरकारी प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या स्कॅम हल्ल्यांमध्ये अनुक्रमे ८०% आणि ७०% घट झाली आहे. गुगल मेसेज दरमहा ५०० दशलक्षांहून अधिक स्कॅम मेसेजेस ब्लॉक करत आहे.
भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे गुगल पे अॅप युजर्सना संशयास्पद व्यवहाराबाबत ४.१ कोटीहून अधिक अलर्ट्स पाठवले असून, २०२४ मध्ये सुमारे १३,००० कोटी रुपयांची फसवणूक टाळण्यात मदत केली आहे. गुगलच्या गुगल प्ले प्रोटेक्टने ऑक्टोबर २०२४ पासून भारतात सुरू झालेल्या पायलट प्रकल्पात १.३ कोटी उपकरणांवर सुमारे ६ कोटी धोकादायक अॅप्सचे इंस्टॉल रोखले आहेत.
सायबर सुरक्षेला व्यापक स्तरावर बळकटी देण्यासाठी गुगलने एक नवीन AI-संचालित यंत्रणा सादर केली आहे, जी धोक्यांचे लवकरात लवकर निदान करते आणि ती माहिती इतर कंपन्यांना आणि सरकारी यंत्रणांना शेअर करते. गुगल सिक्योरिटी विभागाच्या उपाध्यक्ष हीदर अॅडकिन्स यांनी सांगितले की, “ऑनलाईन धोके आता मशीनच्या वेगाने विकसित होत आहेत. AI मधील शिकण्याची, विचार करण्याची आणि व्यापक प्रमाणावर काम करण्याची क्षमता रक्षणकर्त्यांना हल्लेखोरांपेक्षा पुढे राहण्यास मदत करत आहे.







