गूगल लवकरच दक्षिण कोरियामध्ये यूट्यूब व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी एक स्वतंत्र प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन (स्टँडअलोन सबस्क्रिप्शन) सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये म्युझिक स्ट्रीमिंगचा पर्याय उपलब्ध नसेल. देशाच्या अँटी-ट्रस्ट (विरोधी एकाधिकार) नियामक संस्थेने मंगळवारी सांगितले की, ही योजना कोरियामधील कथित स्पर्धाविरोधी प्रथांपासून बचाव करण्यासाठी एक स्वेच्छेने स्वीकारलेले सुधारात्मक पाऊल आहे. योनहाप वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, फेअर ट्रेड कमिशन (FTC) च्या म्हणण्यानुसार, ‘यूट्यूब प्रीमियम लाइट’ नावाच्या या नवीन स्टँडअलोन उत्पादनाची किंमत सध्या अस्तित्वात असलेल्या यूट्यूब प्रीमियम प्लॅनच्या जवळपास निम्मी असेल.
FTC ने सांगितले की, अँड्रॉइड युजर्स यूट्यूब प्रीमियम लाइट सबस्क्रिप्शन ८,५०० वॉन (अंदाजे ६.१५ अमेरिकी डॉलर) प्रति महिना दराने घेऊ शकतात, तर iOS युजर्स साठी ही किंमत १०,९०० वॉन प्रति महिना असेल. ही योजना गूगलने आपली स्पर्धाविरोधी पद्धत म्हणजे यूट्यूब म्युझिकला यूट्यूबच्या जाहिरातविरहित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेसोबत बंडल करून देण्याच्या प्रथेवर उपाय म्हणून सादर केली आहे. २०२० मध्ये गूगलने असा प्रॉडक्ट लाँच केल्यानंतर, २०२३ मध्ये दक्षिण कोरियाच्या फेअर ट्रेड कमिशनने गूगलच्या स्पर्धा कायद्याच्या कथित उल्लंघनाची चौकशी सुरू केली होती.
हेही वाचा..
२७ धावांत संपली वेस्ट इंडीजची कहाणी
युक्रेन युद्ध संपवा अन्यथा १०० टक्के कर आकारणीला सामोरे जा!
टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करण्यास सज्ज
भूकंपाच्या धकक्यांनी हादरले फिलीपिन्स
FTC ने असा आरोप केला की, गूगल ग्राहकांना अनिवार्यपणे दोन्ही सेवा घेण्यास भाग पाडत होते, आणि केवळ जाहिरातविरहित व्हिडिओ स्ट्रीमिंग हवी असणाऱ्यांसाठी पर्याय मर्यादित करत होते. यामुळे ग्राहकांच्या निवडीवर मर्यादा आली आणि गूगलने बाजारातील आपले वर्चस्व दुरुपयोग केले. दीर्घ कायदेशीर लढाई टाळण्यासाठी, गूगलने FTC च्या ‘सहमती निर्णय’ (Consent Decision) प्रक्रियेनुसार स्टँडअलोन व्हिडिओ स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही प्रक्रिया FTC ला चौकशी स्थगित करण्याची परवानगी देते, जर संबंधित कंपनी स्वेच्छेने ग्राहकांच्या नुकसानाची भरपाई करणारे उपाय सुचवते.
FTC ने सांगितले की, ते १४ ऑगस्ट पर्यंत, म्हणजे पुढील ३० दिवसांत, विविध मंत्रालये व हितधारकांकडून प्रतिक्रिया घेतल्यानंतर गूगलचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही यावर अंतिम निर्णय घेतील. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर गूगल या वर्षाच्या अखेरपर्यंत यूट्यूब प्रीमियम लाइट सेवा सुरू करणार आहे. या प्रस्तावांतर्गत, गूगलने असेही जाहीर केले आहे की, वापरकर्त्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी यूट्यूब प्रीमियम लाइट आणि यूट्यूब प्रीमियमच्या किमती किमान एक वर्षासाठी स्थिर ठेवण्यात येतील.
तसेच, गूगलने कोरियन म्युझिक इंडस्ट्रीच्या विकासासाठी एक १५ बिलियन वॉनचा फंड स्थापन करण्याची घोषणाही केली आहे, जो नवीन कलाकारांना शोधण्यासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करेल.







