वैमानिक गोपी थोटाकुरा हे पर्यटक म्हणून अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनने न्यू शेफर्ड – २५( एनएस-२५) मोहिमेसाठी अंतराळ प्रवास करणाऱ्या क्रूची घोषणा केली असून त्यात गोपी यांचा समावेश आहे. विमानउड्डाणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक विंग कमांडर राकेश शर्मा हे सन १९८४मध्ये अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले होते.
ब्लू ओरिजन कंपनीने गोपी यांची ओळख करून दिली आहे. ‘गोपी हे वैमानिक असून ते गाडी चालवण्याआधी विमान उडवायला शिकले आहेत. गोपी यांनी पायलट बुश, एरोबेटिक, सीप्लेन्स तसेच ग्लायडर्स, एक आंतरराष्ट्रीय मेडिकल जेट आणि एका वैमानिकाच्या रूपात काम केले आहे. त्यांनी नुकतेच माऊंट किलिमंजारोचे शिखर सर केले होते.’
या अंतराळ मोहिमेसाठी निवड झाल्याने गोपी आनंदात आहेथ. ‘ब्लू ओरिजिनचे ब्रीदवाक्य ‘पृथ्वीच्या भल्यासाठी’ अशी आहे. त्यामुळे वसुंधरेच्या रक्षणासाठी ते पृथ्वीच्या बाहेर जीवन आणि साहसाचा शोध घेत आहेत. अंतराळात जीवनाचा शोध घेण्यासाठी ते सर्व प्रकारची मेहनत घेत आहेत, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया गोपी यांनी दिली.
गोपी यांनी भविष्यातील अवकाश पर्यटनाबाबतही मते मांडली आणि यामुळे विविध क्षेत्रे कधी खुली होतील आणि सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्याजोग्या किमतीत ही सोय उपलब्ध होईल, याबाबत त्यांनी आशा व्यक्त केली. ‘मी यावेळी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. कारण या भावना व्यक्त करण्यासाठी डिक्शनरीत शब्दच नाहीत.
अंतराळ पर्यटन परवडण्याजोगे बनवण्यासाठी कोणत्या तरी कंपनीने सुरुवात केल पाहिजे, असेही ते म्हणाले. अंतराळ पर्यटन वाढवण्यासाठी ब्लू ओरिजिनने खासगी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र उघडण्याकरिता नासासोबत करार केला आहे.
‘मला विश्वास आहे की अवकाश पर्यटन हेच भविष्य आहे,’ असे ते म्हणाले.
हेही वाचा :
बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी
बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी
‘अमेरिकेतील भारतीयांच्या मृत्यूमागे अनेक कारणे’
महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनने त्यांच्या एनएस-२५ मोहिमेसाठी सहा व्यक्तींच्या क्रूची घोषणा केली आहे, ज्यात मेसन एंजल, सिल्वेन चिरॉन, केनेथ एल हेस, कॅरोल शॅलर, गोपी थोटाकुरा आणि माजी वायुसेना कॅप्टन एड ड्वाइट यांचा समावेश आहे.