31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषआयपीएलच्या 'या' पाच संघांकडे आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर

आयपीएलच्या ‘या’ पाच संघांकडे आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामा थराराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यंदाच्या मोसमात दोन वेळा २५० हून अधिक धावा झाल्या आहेत. तर अनेक सामन्यांमध्ये ४०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. अनेकदा असे झाले आहे की, फलंदाजांनी आपल्या वादळी फलंदाजीने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. आज आम्ही तुम्हाला या हंगामातील पाच सर्वोत्तम फिनिशरबद्दल सांगणार आहोत.

कोलकाता नाईट रायडर्स

केकेआरकडे आंद्रे रसेलच्या रूपाने एक विस्फोटक मॅच फिनिशर आहे. रसेलने यंदाच्या मोसमात २१२.९६ च्या स्ट्राईक रेटने धावा वसूल केल्या आहेत. रसेल अनेक वेळा गेम चेंजर ठरला आहे. एकट्याने सामना वळवण्याची क्षमता त्याच्यात आहे.

रॉयल चैलेंजर्स बेंगलोर

आरसीबीकडून यंदाच्या मोसमात केवळ दोनच फलंदाज लयीत दिसले आहेत. सलामीला विराट कोहली आणि खालच्या फळीत दिनेश कार्तिक. कार्तिक या सीझनमध्ये आपल्या जुन्या लयीत दिसत आहे. कार्तिकने १९०.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या असून एक सामना त्याने एकट्याने जिंकला आहे. तर कार्तिकने मुंबई विरुद्ध वादळी अर्धशतक झळकावले.

सनरायझर्स हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने १९३.७५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. क्लासेन सनरायझर्स हैदराबाद संघाला एकट्याने सामना जिंकून देऊ शकतो. केकेआर विरुद्ध क्लासेनने प्रति षटक सुमारे २० धावा करून संपूर्ण सामना बदलून टाकला.

हे ही वाचा :

रोहीत शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद

‘अमेरिकेतील भारतीयांच्या मृत्यूमागे अनेक कारणे’

अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

पंजाब किंग्स

या मोसमात पंजाब किंग्जकडून शशांक सिंग मॅच फिनिशर म्हणून समोर आला आहे. गुजरातविरुद्ध शशांकने दे देणादण खेळी केली होती. शशांक यंदाच्या मोसमात १९५.७१ च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. हैदराबादविरुद्धही शशांकने बाजी जवळजवळ उलटवली, पण त्याच्या संघाला दोन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

गुजरात टायटन्स

राहुल तेवतिया गुजरातसाठी वरदानापेक्षा कमी नाही. तेवतिया जुन्या लयीत दिसत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तेवतियाने आपल्या शैलीत संघाला विजय मिळवून दिला. तो कोणत्याही परिस्थितीत संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा