31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरक्राईमनामाअल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक

अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक

वारंवार बलात्कार, गरम पाण्याने हात भाजणे, बळजबरीने इस्लाम स्वीकारणे

Google News Follow

Related

इराक आणि सीरियामधील दोन अल्पवयीन यझिदी मुलींच्या लैंगिक शोषण आणि गुलामगिरीसाठी जबाबदार असलेल्या दोन आयएसआयएस दहशतवाद्यांना जर्मनीतील पोलिसांनी पकडले. आशिया आर. ए. आणि टवाना एच. एस. या दोन दहशतवाद्यांना जर्मनीच्या बरैया राज्यातील रेगेन्सबर्ग आणि रॉथ जिल्ह्यातून पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर मानवतेचे उल्लंघन करणारे गुन्हे, नरसंहार, युद्ध आणि परदेशी दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व धारण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आशिया या मुलीचा मेकअप करून तयार ठेवाची तर, ट्वाना दोन्ही मुलींवर वारंवार बलात्कार करायचा, हे तपासात उघड झाले आहे. त्या मुली तेव्हा पाच आणि १२ वर्षे वयाच्या होत्या. ‘चुका’ केल्यास या मुलींवर अमानुष अत्याचार आणि शारीरिक हिंसाचार केल जात असे. शिक्षेमध्ये मोठ्या मुलीला झाडूने मारले जात असे तर, लहान मुलीचा हात गरम पाण्यात टाकून भाजला जात असे. यझिदी धर्म नामशेष करण्यासाठी आयएसआयएस विचारसरणीचा भाग म्हणून पीडितांना घरकाम करण्यास आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले.

आशिया आर. ए. आणि ट्वाना एच एस यांचे इस्लामिक कायद्यानुसार लग्न झाले होते आणि ते सन २०१५ ते २०१७ दरम्यान आयएसआयएसशी संबंधित होते. सीरिया सोडण्यापूर्वी त्यांनी पीडितांना इतर आयएसआयएस दहशतवाद्यांकडे सोपवले. या दोघांना आता कोठडीत ठेवण्यात आले आहे.

जर्मनीतील हे पहिले प्रकरण नाही

ऑक्टोबर २०२१मध्ये, म्युनिकमधील एका न्यायालयाने एका जर्मन महिलेला याझिदी मुलीला गुलाम बनवून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जेनिफर डब्ल्यू या महिलेला दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविण्यात आले.

जानेवारी २०२३ मध्ये, जर्मनीने यझिदी समुदायाविरुद्धच्या गुन्ह्यांना नरसंहार म्हणून मान्यता दिली. आयएसआयएसने दहशत पसरवण्यास सुरुवात केली तेव्हा एक हजारांहून अधिक जर्मन नागरिक आयएसआयमध्ये सहभागी होण्यासाठी जर्मनमधून पळून गेले होते.

आयएसआयएसकडून यझिदींचा छळ

यझिदी हे वांशिक-भाषिक अल्पसंख्याक आहेत, जे उत्तर इराकच्या दहशतवादग्रस्त भागांसह मध्य पूर्वमध्ये राहतात. ते एकेश्वरवादी याझिदी धर्माचे अभ्यासक आहेत, जो जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. ते अप्पर मेसोपोटेमियाचे स्थानिक आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरियाच्या उदयापासून यझिदी धार्मिक नरसंहाराला बळी पडले आहेत. ऑगस्ट २०१४मध्ये जेव्हा इस्लामी दहशतवादी संघटनेने उत्तर इराकच्या सिंजार प्रांतात घुसखोरी केली तेव्हा सुमारे ५० हजार यझिदींना त्यांची घरे सोडून पळून जावे लागले.

या प्रदेशातून कुर्दिश पेशमर्गा सैन्याने माघार घेतल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. यझिदी गैर-मुस्लिम असल्याने, इस्लामिक राज्य त्यांच्याकडे ‘सैतान उपासक’ म्हणून पाहत असे, ज्यांना धर्मांतरित करून गुलाम बनवले जाई. जे यझिदी पळून जाण्यात अयशस्वी झाले त्यांना फाशी देण्यात आली तर स्त्रियांना लैंगिक गुलामगिरीत भाग पाडले गेले. अल्पसंख्याकांनी जिझिया (धार्मिक कर) द्यावा किंवा इस्लाम स्वीकारावा किंवा त्यांना फाशी द्यावी, अशी आयएसआयएसची मागणी होती.

हे ही वाचा:

अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!

दिल्लीची लखनऊवर मात

इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

दहशतवाद्यांनी बलात्कार केलेल्या अनेक यझिदी महिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. अनेक तरुण मुलींना वधू म्हणून विकण्यात आले आणि वारंवार बलात्कार करून त्यांच्यावर क्रूर छळ करण्यात आला. इस्लामवादी अनेकदा इतर दहशतवाद्यांना महिलांची विक्री करण्यासाठी रक्कामधील मोसुलमध्ये तात्पुरते गुलाम बाजार बांधत असत. सन २०१४मधील संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, सुमारे पाच हजार यझिदींची हत्या करण्यात आली, तर पाच हजार ते सात हजार महिला आणि मुलांना पकडण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा