28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषदिल्लीची लखनऊवर मात

दिल्लीची लखनऊवर मात

Google News Follow

Related

जेक फ्रेझर-मॅकगर्कचे अर्धशतक ठोकून दमदार पदार्पण आणि कुलदीप यादवच्या तीन विकेटच्या जोरावर दिल्लीने लखनऊवर लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर सहा विकेटने मात केली. दिल्लीने लखनऊला सात बाद १६७वर रोखल्यानंतर हे लक्ष्य अवघ्या १८.१ षटकांतच पार करून लखनऊवर पहिलावहिला विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीच्या क्रमांक एकने वाढला असून बंगळुरूची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

मॅकगर्कने ३५ चेंडूंत केलेल्या ५५ धावा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या ४१ धावा अशा ७७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने त्यांचा हंगामातील दुसरा विजय मिळवला. पृथ्वी शॉने ३२ धावा केल्या. मात्र रवी बिश्नोईने त्याला बाद केल्यानंतर दिल्लीची अवस्था दोन बाद ६३ अशी झाली होती. मात्र पंतने बिश्नोईच्या डोक्यावरून उंच षटकार खेचून पुन्हा सामन्यात जान आणली आणि स्वतःचा आयपीएलएमधील तीन हजार धावांचा पल्लाही गाठला. आणि सामन्यातील २९ चेंडूंमधील चौकाराचा दुष्काळही संपवला. त्यानंतर जोर आलेल्या फ्रेझर-मॅकगर्कनेही क्रुणाल पांड्याला सलग तीन षटकार खेचले. त्यानंतर मैदानात उतरलेले शाई होप आणि त्रिस्टान स्टब्स यांनी लक्ष्याचा पाठलाग करून ११ चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

लखनऊकडून आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर आयुश बदोनी याने अर्धशतक ठोकले. मात्र कुलदीप यादवने २० धावा देत तीन विकेट घेऊन लखनऊच्या आशा धुळीस मिळवल्या. कुलदीपने केएल राहुल, मॅर्कस स्टोईनिस आणि निकोलस पूरन या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. खलील अहमद यानेही दोन विकेट घेतल्या. तर, इशांत शर्मा (३६ धावा देऊन एक विकेट) आणि मुकेश कुमार (४१ धावा देऊन एक विकेट) यांनी लखनऊची अवस्था सात बाद ९४ अशी केली होती. त्यानंतर बदोनी याने सामन्याची सूत्रे हाती घेऊन पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. तसेच, अर्शद खान (१६ चेंडूंत २० धावा)सोबत आठव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

हे ही वाचा:

इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

वानखेडेवर कोहलीचे ‘विराट’ मन

पंतचे वाईट नेतृत्व आणि दिल्लीच्या छेत्ररक्षणातील ढिलाईमुळे बदोनी आणि अर्शद यांनी गोलंदाजांची पिसे काढली. बदोनी याने १९व्या षटकात मुकेशच्या गोलंदाजीवर १३ धावा कुटल्या. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत अर्धशतक ठोकले. अर्शदची साथ मिळाल्यामुळे लखनऊला १६० धावांचा टप्पा पार करता आला. मात्र लखनऊच्या मधल्या फळीतील पाच फलंदाज अवघ्या २८ धावांत बाद झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा