33 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषवानखेडेवर 'सूर्या' तळपला!

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

Google News Follow

Related

सूर्यकुमार यादवने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध तुफानी आक्रमक खेळी केली. सूर्याने २७३.६८ च्या स्ट्राइक रेटने १९ चेंडूत ५२ धावा चोपून काढल्या. त्याच्या या दे दणादण खेळीने अनेक विक्रम मोडले गेले. मोसमातील पहिल्याच सामन्यात सूर्याभाऊ शून्यावर बाद झाले होते. पण, दुसऱ्या सामन्यात त्याने अशी शानदार खेळी केली की त्याने प्रतिस्पर्धी आरसीबीला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

  • सूर्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
  • मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले.
  • मुंबईने १९० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा सर्वाधिक चेंडू राखून ठेवण्याचा विक्रम केला.
  • २०१४ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने ३२ चेंडू राखले होते.
  • तर बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईने १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २७ चेंडू बाकी ठेवले होते.
  • गेल्या मोसमातही मुंबईने आरसीबीविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. २०२३ मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये वानखेडेच्या याच मैदानावर खेळताना मुंबईने बेंगळुरूसमोर २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २१ चेंडू बाकी ठेवले होते.
  • वानखेडेवर मुंबईविरुद्ध बेंगळुरूचा हा सलग सहावा पराभव. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव होता. वानखेडेवर बेंगळुरूने २०१५ मध्ये मुंबईविरुद्ध विजय मिळवला आहे.

हेही वाचा :

विमाने खरेदी करण्यासाठी ६५ हजार कोटींची निविदा

कुराण जाळणारा इराकचा सलवान मोमिक जिवंत!

“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”

‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लवकरच विधानसभा निवडणूक होणार’!

अशा प्रकारे मुंबई जिंकली
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १९६ धावा केल्या होत्या. संघासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा