31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरक्राईमनामाविवस्त्र करून मारहाण केल्यामुळे कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या

विवस्त्र करून मारहाण केल्यामुळे कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या

तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

कोपर्डी येथे एका दलित तरुणाने त्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवार, २ मे रोजी ही दुर्दैवी घटना कोपर्डी येथे घडली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून याचा उलगडा झाला असून याआधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाजवळच हरणवस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे (वय ३७ वर्षे) हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता. त्यावेळी त्याच्या नाचण्याला हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला होता. काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. त्यानंतर नितीन शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करत पुन्हा मारहाण करण्यात आली शिवाय त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला. अखेर सकाळी त्याने घरी निरोप पाठवला तेव्हा त्याचे नातलग कपडे घेऊन आले आणि त्याला घरी नेले. मात्र, गुरुवारी दुपारी नितीनने घरातच आत्महत्या केली.

दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी मृताचे वडील कांतीलाल शिंदे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, १ मे रोजी कोपर्डी गावात भैरवनाथाच्या यात्रेतील तमाशात भांडणे झाली. त्यावेळी दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे गुरुवारी गावात समजले. त्यानंतर जवळच राहत असलेल्या आपल्या मुलाच्या घरी चौकशीसाठी गेलो असता तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. थोड्या वेळाने आपला लहान मुलगा शांतीलाल याचा फोन आला आणि नितीन स्मशानभूमीत नग्न अवस्थेत असल्याचे त्याने सांगितले. घरून कपडे पाठवून त्याला घरी आणले. यावेळी तमाशात नाचलो म्हणून आपणास वरील तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्न केले. या अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा नाही, अशी हकीकत नितीनने सांगितली.

हे ही वाचा:

कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…

मोदी म्हणतात, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, ही बाळासाहेबांना श्रद्धांजली

‘हिंदूंवर जिझिया कर’

राहुल गांधी रायबरेलीतून लढणार; अमेठीतून केएल शर्मा रिंगणात

पोलीस अधीक्षक राजेश ओला यांनी सांगितले की, नितीन शिंदे याच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत गावातील काही जणांची नावे लिहिली आहेत. त्याआधारे गुन्हा दाखल केला जाणार असून त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा