28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषपॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!

पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!

कॅलिफोर्निया विद्यापीठ कॅम्पस पोलिसांकडून रिकामा

Google News Follow

Related

अमेरिकेतील विद्यापीठांतील कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या पॅलिस्टिनी समर्थकांच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. पोलिसांनी सुमारे दोन हजारांहून अधिक आंदोलक विद्यार्थ्यांना अटक केली आहे.अमेरिकेतील कानाकोपऱ्यांत सध्या पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांना हिंसक वळण लागत असल्याने पोलिसांकडूनही अटकसत्र सुरू आहे.

गेल्या २४ तासांत लॉस एंजेल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थी आंदोलक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शेकडो आंदोलकांना कॅम्पस रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी त्याला न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले. काहींनी मानवी साखळीही उभारली. अखेर पोलिसांनी पाण्याचा फवारा मारून गर्दीला पांगवले.

हे ही वाचा:

प्रज्वल रेवण्णा यांची कृष्णाशी तुलना!

प्रज्वल रेवण्णा यांच्याकडे होता डिप्लोमॅटिक पासपोर्ट!

विवस्त्र करून मारहाण केल्यामुळे कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या

कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…

येथे सुमारे २०० जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कोणते आरोप ठेवायचे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. गाझापट्टीमध्ये युद्ध करून हजारो पॅलिस्टिनींच्या मृत्यूंना कारणीभूत ठरणारे इस्रायल किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांशी व्यापारी संबंध तोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.१७ एप्रिल रोजी कोलंबिया विद्यापीठात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले आहे. इस्रायल-हमास युद्ध थांबवावे, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या युद्धात आतापर्यंत गाझा पट्टीतील सुमारे ३४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसले आणि विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले. तत्पूर्वी आंदोलकांना हा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अटकसत्र सुरू झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा