27 C
Mumbai
Monday, August 8, 2022
घरविशेषअमरनाथ यात्रेतील भाविकांसाठी मदतकेंद्र सुरू, वाचा सविस्तर

अमरनाथ यात्रेतील भाविकांसाठी मदतकेंद्र सुरू, वाचा सविस्तर

Related

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात १५ भाविकांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे बेपत्ता भाविकांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत आहेत. तसेच अमरनाथ यात्रेतील भाविकही चिंतेत असल्याने अमरनाथ येथे मदतकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संदर्भात, विश्व हिंदू परिषद, बाबा अमरनाथ बुडा अमरनाथ यात्री निवास, सनातन धर्म सभा आणि संबंधित संघटनांद्वारे पिडीत कुटुंबांना माहिती, सेवा आणि मदतीसाठी काही ठिकाणी मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

खाली दिलेली केंद्र मदतीसाठी सुरू करण्यात आली आहेत.

  • यात्री निवास चंद्र कोट रामबन: श्री. आशिष शर्मा – ७००६४९३७०६
  • यात्री निवास भगवती नगर जम्मू: श्री. अभिषेक गुप्ता – ९४६९३०००००
  • जम्मू रेल्वे स्टेशन: श्री. प्रियदर्शन – ९४६९२११०४१
  • त्रिकुटा यात्री निवास आणि शक्ती आश्रम जम्मू: श्री. शक्ती दत्त शर्मा – ९७९६६९२०५८
  • गीता भवन परेड जम्मू: श्री. सुदर्शन खजुरिया – ९४१९१९८११८

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यायातून रेड सर्व्हर जप्त

डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!

दरम्यान, झालेल्या अपघातातील मृतांमध्ये सात महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे ४० लोक बेपत्ता असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. सुमारे १५ हजार यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
15,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा