30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषहिमाचल प्रदेशात रेल्वे ट्रॅक गेला वाहून!

हिमाचल प्रदेशात रेल्वे ट्रॅक गेला वाहून!

२४ तासांत मुसळधार पावसाचा कहर

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे.संततधार पावसामुळे कालका-शिमला रेल्वे ट्रॅकचा काही भाग सोमवारी वाहून गेला.हिमाचल प्रदेशमध्ये सतत पावसामुळे तेथील लोकांचे जलजीवन विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक ठिकाणाचे रस्ते मार्ग बंद करण्यात आले आहेत.कालका-शिमला रेल्वे ट्रॅकचा काही भागही वाहून गेला आहे.

जुटोघ आणि समर हिल रेल्वे स्थानकांदरम्यान किमी ९२/६-९२/७ येथील रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे.पावसामुळे कालका-शिमला रेल्वे रुळाखालील जमीन वाहून गेली असून रेल्वे ट्रॅक हवेत झोका घेत आहे. त्याचवेळी, या घटनेनंतर सरकारने कंडाघाट-शिमला दरम्यानची गाड्यांची वाहतूक रद्द केली आहे.
रविवारपासून डोंगराळ भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या एकूण लोकांपैकी ९ जण शिमल्यात झालेल्या भूस्खलनात मृत्यू झाले.

हे ही वाचा:

मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा

चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचले; १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत प्रदक्षिणा

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे सोमवारी मुसळधार पावसामुळे शिवमंदिर कोसळल्याने तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून दिली.दरडीखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते.शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळली.आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या दरडीखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १४ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा राज्याने केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा