25 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरविशेषहिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके

हिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके

लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धा

Google News Follow

Related

सेनादलाच्या हिमांशू तलान याने १४व्या आरआर लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धेत एअर रायफल सीनियर गटात सुवर्णपदक जिंकले. पनवेल, नवी मुंबई येथे लक्ष्य नेमबाजी क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. ज्युनियर गटात पंजाबच्या ओजस्वी ठाकूरने विजेतेपद पटकाविले. तिने २५२ गुण मिळविले.

द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूरच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन गेली काही वर्षे होत आहे. या स्पर्धेत निमंत्रित खेळाडू सहभागी होतात. मात्र महिला आणि पुरुष यांना एकत्र खेळण्याची संधी हा मंच उपलब्ध करून देतो.

या स्पर्धेत प्रथमच भाग घेत असलेल्या २३ वर्षी तलानने २५१.२ गुण मिळविले. महाराष्ट्राच्या मोहित गौडाला त्याने २.२ गुणांनी मागे टाकले आणि दीड लाखाचे इनाम जिंकले. खेळताना आपल्यावर खूप दबाव होता पण शांत आणि संयमाने आपल्याला खेळावे लागेल हे मनाशी ठरविले आणि माझ्या शॉट्सवर लक्ष केंद्रित केले. आपण २०२६ची राष्ट्रकुल आणि २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये विजयी ठरण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सेनादलाचा गुरजंत सिंग याने २२८.२ गुणांह तिसरे स्थान मिळविले.

हे ही वाचा:

यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!

शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन!

पंतप्रधानांनी ईडीला दिली शाबासकी, भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईबद्दल कौतुक

हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!

एअर रायफलच्या ज्युनियर गटात १५ वर्षीय ओजस्वी ठाकूरने २५२ गुणांसह पहिले स्थान मिळविले. तिला ७५ हजारांचे इनाम मिळाले. ओजस्वी ही मोहाली, चंदीगढची खेळाडू आहे. तिने या अंतिम फेरीत पहिल्या शॉटपासूनच आघाडी घेतली. ओजस्वी ही गोस्पोर्ट्स आणि इन्फोसिसच्या गर्ल्स फॉर गोल्ड या उपक्रमाची सदस्य आहे. हरयाणाचा तलवार सिंग याने २५१.५ गुणांसह रौप्य तर नौदलाचा अजय मलिक याने २२९.८ गुणांसह तिसरे स्थान मिळविले.

भारतीय नेमबाजी संघाचे उच्च कामगिरी संचालक डॉ. पिएरे बाऊचाम्प यांच्या देखरेखीखाली ही अंतिम लढत पार पडली. या स्पर्धेसाठी सुमा यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे पती सिद्धार्थ शिरूरही यावेळी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा