‘मी पुन्हा येईन’ ही केवळ सिंगल लाईन न्हवती.मी पुन्हा येईन याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या.त्यामध्ये मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं त्यात होत.पण, मी पुन्हा येईन हे एवढेच वाक्य सर्वांनी धरलं अन ते मोठया प्रमाणात प्रसिद्ध झालं.लोकांनी आम्हाला निवडून देखील दिलं.सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले.मात्र, मी म्हणालो होतो, मी पुन्हा येईन, त्यासाठी बराच वेळ गेला, अडीच वर्षे लागली पण, जेव्हा मी आलो तेव्हा येताना दोन पक्ष फोडून आलो, अन येताना दोघांना सोबत घेऊन आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये पार पडला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं.यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली.तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय मुद्यांसह अनेक विषयांवर भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उध्दव जी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला.एक वेळ अशी देखील होती.आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा लोक म्हणाले, बघ हे पुन्हा येईल म्हणाले अन आले.
सरकार जेव्हा बनली नाही तेव्हा लोक म्हणाले, बघा हे पुन्हा येईन म्हणाले पण त्यांच्या अहंकारामुळे ते आले नाहीत.हे सर्व राजकारणात चालत राहत.मात्र, मी म्हणालो होतो की, मी पुन्हा येईन, त्यासाठी मला अडीच वर्ष लागली.पण, मी अडीच वर्षानंतर असा आलो की, दोन पक्ष फोडून आलो अन येताना दोघांना घेऊन आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम भारतातच!
ते पुढे म्हणाले की, ४०० पार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत.आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही महाराजांनी मजा घेतली नाही.
त्यांनी केवळ स्वतःला छत्रपती म्हणून यासाठी घोषित केले की, जगाला समजेल पाहिजे की, हिंदवी साम्राज्याची स्थापना झाली आहे आणि आपण गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी, हा विश्वास आहे यात अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मोदीजींचा तुम्हाला जो कॉन्फिडन्स दिसत आहे, हा कॉन्फिडन्स आहे अहंकार नाहीये.कारण मोदीजींनी जनतेला ओळखलं आहे.मोदींजींच्या आता हे लक्षात आलं आहे की, लोक त्यांना तिसऱ्यावेळी संधी द्यायला तयार आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसते तर दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टचार झाला नसता. राज्यात ३० ते ४० वर्षापूर्वी एका घराण्यापुरते राजकारण असायचं. आधी काही बाहुबली होते. पण आता ते बदलले आहे. देश कदाचित आताच विकसित झालेला असता. सांस्कृतिक दृष्ट्या देश पुढे असला असता. ३७० सारख्या चुका झाल्याचं नसत्या, अशी टीका त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी केली.
पक्ष फुटीचे कारण एकच ते म्हणजे परिवारवाद
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी केला. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादामुळेच हे सगळे झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सक्षम व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणे म्हणजेच परिवाद आहे. कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खरगे स्वत: काही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय राहुल गांधीच घेतात हे लोकांना माहीती आहे. काल गृहमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी का फुटली. कारण पवारांनी पक्ष पुतण्याला नाही तर मुलीला दिला. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसली तरी स्वतःच्या सामर्थ्यावर आलेल असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं हे आम्ही दाखवलं
महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ मानलं जातं. त्याचे कारण म्हणजे आतापर्यंत पक्षांनी पॉवर मॅन, गुन्हेगारांना संधी दिल्या होत्या. यावर देवेंद्र फडणवीस विचारले असता ते म्हणाले की, सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता असं राजकारण सुरू होतं. सुरुवातीच्या काळातील राज्यातील राजकारण पाहिलं तर, ५० परिवार आहेत, ज्यांच्या भोवती हे राजकारण फिरत राहिलं, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काही परिवार असेही आहेत की, ज्यांनी समाजकार्य सुद्धा केलं आहे.पण, काहींनी नाही. बाहुबली, गुन्हेगार यांची गरज भासू लागली आणि मग या सर्वांचा प्रवेश होऊ लागला.मात्र, २०१४ नंतर पंतप्रधानांनी देश आणि महाराष्ट्र दोन्हीकडील राजकारणाचे चित्र बदललं आहे. ही व्यवस्था तोडण्याच काम मोदींनी केलं आहे. मी हे म्हणू शकतो की, आपण हे करू शकलो कारण, मोदीजी यांचं नेतृत्व आमच्या मागे होतं. गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं हे आम्ही मागच्या १० वर्षात दाखवलं आहे.१०० टक्के यश मिळालं असं नाही. पण, काम सुरु आहे. आणखी पुढे जायचं असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.