हिंदू कधीच आतंकवादी होवू शकत नाही, हे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. हिंदू धर्माचा व्यक्ती अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. हिंदू दहशतवाद नावाने आमच्या समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, त्यांची तोंडे आजच्या निकालाने काळी झाली असतील, असे भाजपा मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मालेगाव स्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने आज निर्दोष मुक्तता केली. आरोपींविरुद्ध पुराव्याचा अभाव असल्याचे नमूद करत कोर्टाने हा निर्णय दिला. कोर्टाच्या निकालानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले, मालेगाव स्फोट प्रकरणावरून हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. अशी बदनामी करण्याचा पुन्हा कोणी प्रयत्न करू नये, आतंकवाद रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. हिंदूंनीच हिंदूंची बदनामी केली, अशा लोकांनी आता माफी मागितली पाहिजे.
या प्रकरणी सादर करण्यात आलेले पुरावे कोर्टात सिद्ध करू शकले नाहीत. हिंदू समाजाचा द्वेष करून, बदनामी करणे हा एक कलमी कार्यक्रम कॉंग्रेसच्या माध्यमातून चालू होता. हिंदू विरोधी भूमिकेसाठी लोकांना ताकद देणे, आतंकवाद्याला-जिहादला ताकद देणे, हे सिद्ध झाले आहे.
हे ही वाचा :
मालेगाव ब्लास्ट प्रकरण काँग्रेसची साजिश
भारताचा जीडीपी ६.५ टक्के वाढेल
सोनिया गांधी आणि राहुल यांनी हिंदूंनी माफी मागावी
‘दहशतवाद कधी भगवा नव्हता, ना आहे आणि कधी नसेल!’
ते पुढे म्हणाले, मुस्लीम लीगची भाषा आणि कॉंग्रेसची भाषा एकच असते. पाकिस्तानची भाषा कॉंग्रेसची भाषा एकच. आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी षड्यंत्र रचले, गजवा-ए-हिंद करणाऱ्यांची जी भाषा आहे तशी भाषा आतापर्यंत कॉंग्रेसची लोकं बोलत आली आहेत. भगवा दहशतवाद खरच होता का?, यातील लोक खरेच आरोपी होते का?, याबाबत ते पुरावे देवूच शकले नाहीत, कुठल्याही परिस्थिती हिंदू समाजाची बदनामी करायची, हे त्यांचे षडयंत्र हाणून पाडले आहे.







