28 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरविशेषअय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

मुस्लिम टीम लीडरवर धार्मिक भेदभावाचा आरोप

Google News Follow

तेलंगणातील हैदराबादजवळील आदिबटला येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या कार्यालयात अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला पारंपरिक धार्मिक वेशभूषेमुळे प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. मनीष असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने मुस्लिम टीम लीडर सिकंदर शाह यांच्यावर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर अय्यप्पा भक्त आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी टीसीएस कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

मनीष गेल्या दोन वर्षांपासून टीसीएस मध्ये काम करत आहे. त्याने अय्यप्पा दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वीच कंपनी व्यवस्थापनाला दिली होती. दीक्षा घेतल्यानंतर तो अय्यप्पा माळ धारण करून पारंपरिक मुंडू (धोतर) परिधान करून कार्यालयात पोहोचला. मात्र, कंपनीच्या ड्रेस कोडचे पालन केले नसल्याचे सांगत त्याला प्रवेश नाकारण्यात आला, असा त्याचा आरोप आहे.

मनीषच्या म्हणण्यानुसार, कंपनीतील अन्य टीममध्ये अय्यप्पा माळ धारण केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. मात्र, आपल्या टीममध्येच आक्षेप घेतला जात असल्याचा त्याचा दावा आहे. टीम लीडर सिकंदर शाह यांनी आपल्याला प्रवेश रोखल्याचा आरोपही त्याने केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ अय्यप्पा भक्त आणि स्थानिक हिंदू संघटनांनी कार्यालयाबाहेर जमून घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्याला धार्मिक वेशभूषेत कामावर येण्याची परवानगी द्यावी आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोडचे समान नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

हे ही वाचा:

चौकशीसाठी आलेल्या अभिषेक बॅनर्जींसमोर ‘चोर-चोर’ घोषणाबाजी

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह येणार भारत दौऱ्यावर

पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली

तिरुपरंकुंद्रम टेकडीवर दीप प्रज्वलनास परवानगी

दरम्यान, पोलिसांनी या घटनेला धार्मिक भेदभावाचे स्वरूप देण्यास नकार दिला आहे. आदिबटला पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रेस कोडसंदर्भातील गैरसमज होता. मनीष पारंपरिक धोतर परिधान करून आल्याने एचआर विभागाने त्याला पँट घालण्यास सांगितले होते. आंतरराष्ट्रीय ग्राहकांना भारतीय पारंपरिक वेशभूषेची माहिती नसल्याने त्यांना आक्षेप असू शकतो, असे कारण एचआर विभागाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा