29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरविशेषझारखंडच्या माजी डीजीपी म्हणतात, हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होतात!

झारखंडच्या माजी डीजीपी म्हणतात, हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होतात!

अशा गुन्हेगारांना त्यांच्या समाजाकडून कोर्टकचेऱ्यांच्या बाबतीत मदत मिळते.

Google News Follow

Related

हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतरण करणे आणि त्यासाठी मोठा निधी मिळविणे हे काही मुस्लिमांकडून होत असल्याचे खळबळजनक विधान झारखंडच्या माजी पोलिस महासंचालक निर्मल कौर यांनी केले आहे.

१९८३च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या निर्मल कौर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, काही मुस्लिमांकडून हिंदू मुलींना लक्ष्य केले जाते आणि त्यांचे अपहरण केले जाते. त्यांना त्यांच्या समाजाकडून कोर्टकचेऱ्यांच्या बाबतीत मदत मिळते.

हिंदू मुलींचे अपहरण करण्याचे कृत्य करणाऱ्यांना मोटरसायकल बक्षीस म्हणून देणे किंवा भरभक्कम आर्थिक मदत करणे हे घडते. त्यांना कायद्यासंदर्भात सगळी मदतही केली जाते. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्यांच्या समाजातील काही लोक हे ठसविण्याचा प्रयत्न करतात की, महिलांना कोणत्याही भावभावना नसतात, त्यांना समाजात काही किंमत नसते. त्यांच्याकडे एक वस्तू म्हणून पाहिले पाहिजे.

हे ही वाचा:

समाजवादीचे नेते अबू आझमी आयकर विभागाच्या रडारवर

१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते

ठाकरे गटाला धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली

विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

 

कौर या पोलिस रिसर्ट अँड डेव्हलपमेंट ब्युरोमध्ये २०१६पर्यंत कार्यरत होत्या. अशाप्रकारची कृत्ये ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्यांकडून केली जातात. त्यांना अशा कृत्यांचा अजिबात पश्चात्ताप नसतो. पण विद्यमान घटनेत (श्रद्धा खून प्रकरण) हा मुलगा विकृत नाहीए तर तो हिंदू मुलींना लक्ष्य करण्याचे काम करतो. या मुलींना वस्तू म्हणून तो पाहतो.

कौर यांनी झारखंडमधील दुमका येथे एका मुलीला शाहरुख नावाच्या मुलाने जाळून मारल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. अशा कृत्यांचे समाजातील काही घटकांकडून समर्थन केले जाते. ही परंपरा अनेक ठिकाणी पसरली आहे.

आफताब या मुस्लिम युवकाने श्रद्धा या युवतीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याची घटना घडली आहे. त्यानिमित्ताने कौर यांनी आपली मते मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा