31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषभारताचे पुरी जगन्नाथ मंदिर किती श्रीमंत आहे?

भारताचे पुरी जगन्नाथ मंदिर किती श्रीमंत आहे?

या कोषागारात नेमक्या किती मौल्यवान वस्तू आहेत, हेच गूढ

Google News Follow

Related

ओदिशातील पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर किती श्रीमंत आहे?, असा प्रश्न लाखो भाविकांना पडतो. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. तसेच, मोठमोठ्या, प्रचंड देणग्या या मंदिरात येत असतात. मंदिरात कोट्यधिश भाविक हिरे, माणके, सोने-चांदीची भेट देवांना देत असतात. यांची खरोखरच किती किंमत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर गेली ४५ वर्षे तरी मिळालेले नाही. कारण मंदिराच्या कोषागाराची शेवटची यादी १९७८मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या कोषागारात नेमक्या किती मौल्यवान वस्तू आहेत, हेच गूढ राहिले आहे.

 

ओदिशा राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या जगन्नाथ मंदिराचे कोषागार तेथील देणग्यांच्या यादीसाठी पुन्हा उघडण्यात यावे, ही मागणी करणारी जनहित याचिका ३० जून रोजी ओरिसा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी नोटीस बजावली आहे. यावर ‘आम्ही उच्च न्यायालयाने पाठवलेली नोटीस वाचून तिला प्रतिसाद देऊ,’ असे मंदिराचे मुख्य प्रशासक रंजन कुमार दास यांनी सांगितले.

हे ही वाचा:

खोटी बातमी देणाऱ्या माध्यमाविरोधात पंकजा मुंडे करणार मानहानीचा दावा

राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका; खासदारकी आठ वर्षांसाठी रद्दच!

अवघ्या १२ दिवसांत पावसाची कमाल; तूट ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर

गुहागारच्या कासवाचा श्रीलंका दौरा

जगन्नाथ मंदिर कायदा, १९५५ नुसार, दर तीन वर्षांनी कोषागारांतील वस्तूंचा आढावा घ्यावा असे नमूद करण्यात आले आहे. याआधी केवळ सन १९२६ आणि १९७८मध्येच याची अंमलबजावणी केली गेली. सन १९७८मध्ये जेव्हा मूल्यांकन केले गेले, तेव्हा यादीत दागिन्यांचा समावेश नव्हता. तर, सन २०१८मध्ये राज्य सरकारने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चाव्याच गायब असल्याने तो अयशस्वी ठरला.

 

मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची नेमकी संख्या आणि मूल्य अज्ञात 

सन १९७८मध्ये केलेल्या तपासणीत १२८ किलोचे सोन्याचे दागिने तर, २२१ किलोच्या चांदीच्या वस्तू आढळल्या. ओदिशातील जगन्नाथ मंदिराच्या मालकीची ३९५.२ एकर जागा (त्यात पश्चिम बंगालमधील ३२२.९ एकर, महाराष्ट्रातील २८.२ एकर, मध्य प्रदेशातील २५.१ एकर, आंध्रमधील १७ एकर, छत्तीसगढमधील १.७ एकर आणि बिहारमधील ०.३ एकर जमिनीचा समावेश) त्याचे मूल्य अद्याप जाहीर नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा