30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरविशेषहैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू...

हैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू जप्त!

दोन ड्रग्ज तस्करांसह १२ ग्राहक ताब्यात, तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोची कारवाई

Google News Follow

Related

तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोने सोमवारी दोन ड्रग्ज तस्करांसह १२ ग्राहक ताब्यात घेतले.एसआरनगर येथील सर्व्हिस अपार्टमेंटवर हा छापा टाकण्यात आला.ताब्यात घेण्यात आलेल्या तस्करांकडून १.८ लाख रुपये किमतीच्या ४० एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिक यादव आणि डी राजेश हे नानकरामगुडा येथील रहिवासी आहेत.हे दोघे आपल्या ग्राहकांना गोळ्या पुरवण्याचे काम करत होते.ताब्यात घेण्यात आलेले १२ ग्राहक आंध्र प्रदेशातील नेल्लोरचे रहिवासी असून ते सर्व ३० वर्षाखालील वयातील आहेत.ज्यामध्ये व्यावसायिक, आयटी व्यावसायिक आणि बेरोजगार तरुणांचा समावेश आहे.हे सर्व ग्राहक सोमवारी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यासाठी एसआरनगर येथील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये एकत्र जमले होते.

हे ही वाचा:

संसद आवारात राज्यसभा सभापतींची केली नक्कल

लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन

नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?

लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशींना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला न येण्याची केली विनंती!

तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आशिक यादवला आम्ही दोन दिवसांपूर्वी पकडले होते.वाढदिवसाच्या पार्टीची माहिती आशिकने आम्हाला दिली.त्यानंतर सोमवारी आमच्या पथकाने सर्व्हिस अपार्टमेंटवर छापा टाकला.या छाप्यात आशिकचा मित्र राजेश आणि इतर ग्राहकांना पकडण्यात आले.पकडलेल्या १२ पैकी तीन ग्राहकांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले.हे सर्व आरोपी आशिक यादव आणि आरोपी राजेश यांचे मित्र आहेत.आरोपी आशिक यादव आणि आरोपी राजेश हे बालपणाचे मित्र आहेत.आरोपी राजेश बेंगळुरूमध्ये शिकत असताना त्याला ड्रग्जचे व्यसन जडले.त्यानंतर आरोपी आशिकसह मिळून हे दोघे ड्रग्ज व्यापारी बनले.हे दोघे नियमितपणे पब आणि इतर हँगआउट्समध्ये पार्टी करत असत.

पूर्वी बेंगळुरू येथून बेकायदेशीररित्या हे दोघे औषधे आणत असत.त्यानंतर दोघांनी गोव्यातुन आपला माल खरेदी करण्यास सुरुवात केली. दोघे बसमधून ड्रग्जची वाहतूक करत असत.पोलिस अधीक्षक सुनिता रेड्डी यांनी सांगितले की, ड्रग्ज तस्करांना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्व ग्राहकांना आरोपी म्हणून घोषित केले असले तरी, तपासादरम्यान त्यांना साक्षीदार मानले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा