30 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरविशेष'आय लव्ह मोहम्मद वाद': काँग्रेस खासदार नजरकैदेत!

‘आय लव्ह मोहम्मद वाद’: काँग्रेस खासदार नजरकैदेत!

युपी पोलिसांनी खासदाराला परवानगी नाकारली 

Google News Follow

Related

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांना बुधवारी (१ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. ते ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टर वादामुळे तणावग्रस्त झालेल्या बरेलीमध्ये पक्षाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत जाण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ७३ जणांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर बरेलीच्या डीआयजींना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार मसूद काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होते. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव आणि सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना सहारनपूर सोडण्यापासून रोखले आणि त्यांना घरातच नजरकैदेत ठेवले. दरम्यान, खासदार मसूद यांच्या नजरकैदेवर काँग्रेस पक्षाने अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

बरेली हिंसाचार प्रकरणी माहिती दिली की, “या घटनेत आतापर्यंत आम्ही एकूण ७३ जणांना अटक केली आहे. लवकरच आणखी अटक केली जाईल.” तसेच अनेक पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि पोलिस पथके व्हिडिओ फुटेज आणि फोन रेकॉर्डद्वारे अतिरिक्त संशयितांची ओळख पटवण्यासाठी तपास करत आहेत.
हे ही वाचा : 

फिलीपिन्समध्ये ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप; ३१ जणांचा मृत्यू

या प्रकरणात पोलिसांनी मौलाना मोहसीन रझा यांना काल (३० सप्टेंबर) अटक केली होती आणि अटकेनंतर उत्तर प्रदेश महानगरपालिकेने त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई सुरु केली. कारवाईचा व्हिडीओ देखील समोर आला, ज्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचे बुलडोजर मौलाना मोहसीन रझा यांची मालमत्ता भुईसपाट करताना दिसले.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा