29 C
Mumbai
Wednesday, April 29, 2026
घरराजकारणभाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

पोटनिवडणूकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली आहे. या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर आणि प्रमोद जठार यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उमेदवारांची निवड पक्षाच्या संघटनात्मक कामगिरी, स्थानिक प्रभाव आणि राजकीय समतोल लक्षात घेऊन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः विविध विभागांतील प्रतिनिधित्व आणि सामाजिक समीकरणांचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेल महागणार?

मिरारोड प्रकरणात एफआयआर आला समोर; हिंदू हो क्या विचारत केला हल्ला!

सिक्कीमसाठी ४,००० कोटींचा विकासाचा महामार्ग

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

दरम्यान, पोटनिवडणुकीसाठीही भाजपने मोठा निर्णय घेत प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संबंधित मतदारसंघात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला देखील सोडचीठ्ठी दिली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी प्रज्ञा सातव यांना भाजपने संधी दिली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत माजी काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. प्रज्ञा सातव या स्थानिक पातळीवर सक्रिय आणि प्रभावी नेत्या मानल्या जातात, त्यामुळे त्यांची निवड ही पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजपचा हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल मानला जात आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देत पक्षाने बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचेही मानले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा