29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरविशेषकोरोनामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप धोक्यात?

कोरोनामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप धोक्यात?

Google News Follow

Related

भारतात कोरोना उद्रेकामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्यात येत आहेत. देशात दररोज २ लाखांच्या आसपास रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. भारतात जाण्यास किंवा भारतातून येण्यास निर्बंध घातले आहेत. त्याचाच फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे. इंग्लंडने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यामुळे ब्रिटनने भारताच्या सर्व प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना १० दिवस क्वारंटाईन सक्तीचं केलं आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी मैदानात उतरायचं आहे. साऊथ हॅम्पटन इथे न्यूझीलंडविरुद्ध भारत अशी फायनल होणार आहे. मात्र या फायनलवर आता कोरोनाचं संकट आहे.

भारतात कोरोना उद्रेक असला, तरी आयसीसी निर्धारित वेळेतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवण्यावर ठाम आहे. “इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि दुसऱ्या बोर्डांनी कोरोना संकटात संपूर्ण सुरक्षितपणे फायनलचं नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या वेळेतच होईल. सध्या आम्ही इंग्लंड सरकारशी रेड लिस्टमधील देशांवर असलेल्या प्रभावाबाबत बातचीत करत आहोत. भारतीय महिला संघही जून महिन्यात यूके दौऱ्यावर आहे. तर पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे”, असं आयसीसीने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोरोनो संकटात काही नियम सैल केले आहेत. खेळाडूंना क्वारंटाईन राहावं लागतं, काहींना संसर्ग होऊ शकतो त्यामुळे अतिरिक्त खेळाडूंना दौऱ्यावर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ७ अतिरिक्त खेळाडू, सपोर्ट स्टाफला दौऱ्यावर नेण्यास परवानगी असेल. त्यामुळे भारतीय टीम जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी ३० जणांच्या ताफ्यासह इंग्लंडला रवाना होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा